Anil Kadam : अनिल कदमांच्या एका व्हिडिओ कॉलने अधिकारी थेट जमिनीवर, वीज मंडळाचा कारभार चव्हाट्यावर

अनिल कदम यांच्या एका व्हिडिओ कॉलमुळे वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या घटनेमुळे वीज विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
Anil Kadam : अनिल कदमांच्या एका व्हिडिओ कॉलने अधिकारी थेट जमिनीवर, वीज मंडळाचा कारभार चव्हाट्यावर
Published on
Updated on

Anil Kadam News: ग्रामीण भागात पाणी आणि वीज हे शेतकऱ्यांचे मुख्य प्रश्न आहेत. अनेकदा कॅनलला पाणी सोडले की वीज गायम होते. त्यामुळे शेतकरी सत्ताधारी पक्ष ऐवजी विरोधकांकडे धाव घेतात. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल कदम वीज मंडळाच्या विरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत आले आहे. ट्रान्सफॉर्मर आणि विजेचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेकदा त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यामुळे वीज मंडळ प्रशासन दबावात असते.

शुक्रवारी ब्राह्मणवाडी भागातील शेतकऱ्यांनी माजी आमदार कदम यांच्याकडे धाव घेतली. येथील ट्रान्सफॉर्मर बंद झाला होता. शेतकऱ्यांनी पाठपुरावा करू नये वीज मंडळ अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. हा प्रश्न कळल्यावर माजी आमदार कदम यांनी थेट अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉल केला. दोन अधिकाऱ्यांनी आणि विशेषता मुख्य अभियंत्यांनी फोन घेतला नाही. मात्र कार्यकारी अभियंत्याने फोन घेतल्या. यावेळी कदम यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या.

Anil Kadam : अनिल कदमांच्या एका व्हिडिओ कॉलने अधिकारी थेट जमिनीवर, वीज मंडळाचा कारभार चव्हाट्यावर
Non Teaching Recruitment : मोठी बातमी: 21 वर्षांची प्रतीक्षा संपली! राज्यात 30 हजार शिक्षकेतर पदांची भरती होणार

यावेळी व्हिडिओ कॉल करून त्यांनी शेतकऱ्यांना वीज मंडळाच्या या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार का? मोर्चा काढायचा ठरला तर मोर्चात येणार का? वीज मंडळाच्या कार्यालयात आंदोलन करायची तयारी आहे का? असा प्रश्न करीत शेतकऱ्यांचा होकार थेट व्हिडिओ कॉलवर दाखवला.

यावेळी कदम यांनी अधिकाऱ्यांना मला आंदोलन करायला भाग पाडू नका. मी वीज मंडळ विरुद्ध अतिशय आक्रमक मोर्चे काढले आहेत. आपण शेतकऱ्यांचा हा गंभीर प्रश्न समजून घ्या. तातडीने ट्रांसफार्मर कार्यरत करा, असे सांगितले यावेळी शेतकऱ्यांनी वर्गणी काढून फ्युज विकत आणल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना दाखविले. व्हिडिओ कॉल वरील ही स्थिती आणि चित्र पाहून अधिकारीही गप्प झाले. त्यांनी लगेचच ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले. सायंकाळपर्यंत हा प्रश्न सुटेल असे आश्वासन दिले.

Anil Kadam : अनिल कदमांच्या एका व्हिडिओ कॉलने अधिकारी थेट जमिनीवर, वीज मंडळाचा कारभार चव्हाट्यावर
FASTag toll rate hike : टोलच्या दरात 1 एप्रिलपासून वाढ; आता वार्षिक पाससाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये!

निफाड हा द्राक्ष आणि बागाइती शेतीचा परिसर आहे. सिंचनासाठी आवर्तन सोडल्यावर येथे शेतकऱ्यांचा पाणी मिळवणे हा सर्वात गंभीर प्रश्न असतो. या समस्येवर त्यांना सत्ताधारी आमदाराकडे जाण्याऐवजी माजी आमदार अनिल कदम हे अधिक विश्वासार्ह वाटले. कदम यांनीही लगेचच प्रश्न सोडवल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com