Maharashtra TET 2026 : शिक्षक पात्रता परिक्षेसाठी (TET) परीक्षेला यंदा 6 लाख उच्चांकी अर्ज दाखल झाले आहे.
विक्रमी उच्चांकी अर्जसंख्या पाहताच, शिक्षण विभागाने देखील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने, परीक्षेची काठिण्यपातळीत वाढ केली आहे. या मुळे परीक्षेत यशाचा मार्ग अधिकच खडतर होणार आहे.
शिक्षक (Teacher) पात्रता परीक्षा ही 21 जून रोजी होत आहे. या परीक्षेतील काठिण्य पातळी हाच परीक्षेचा टर्निंग पाईंट आहे. पूर्वी परीक्षा ही थेट माहितीवर आधारित प्रश्न असायचे. पण गेल्या काही परीक्षांमध्ये प्रश्नांचा कल हा, उपाययोजनात्मक आला होता.
बालमानसशास्त्रात आता केवळ व्याख्या न विचारता वर्गातील प्रत्यक्ष परिस्थिती हाताळण्यावर भर दिला जात आहे, तर गणित आणि विज्ञानात तार्किक विचार क्षमता तपासली जाणार आहे. या मुळे परीक्षेची (TET Exam) काठिण्यपातळीत अधिकच वाढ होणार आहे.
अर्जाचा महापूर आल्याने खऱ्या अर्थाने पात्र उमेदवार निवडण्यासाठी परीक्षा परिषदेने प्रश्नांचा दर्जा केंद्रीय स्तरावरील सीटीईटीच्या धर्तीवर नेला आहे. त्यामुळेच, सहा लाख उमेदवारांच्या या महासंग्रामात केवळ अभ्यासातील सखोलता असलेल्यांनाच संधी मिळणार आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा केवळ पुस्तकीज्ञान किंवा जुन्या प्रश्नपत्रिकांच्या सरावावर, या परीक्षेत उत्तीर्ण होणे आता कठीण होणार आहे. प्रश्नांच्या स्वरूपात झालेले सूक्ष्म बदल उमेदवारांच्या पात्रतेचे गणित बिघडवू शकतात. येत्या 21 जूनला होणाऱ्या या परीक्षेला उमेदवार कोणत्यापद्धतीने समोरे जातात, परीक्षेच्या काठिण्य पातळीवर काय प्रतिक्रिया येतात, याकडे लक्ष लागलं आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा ही 2013 मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी विक्रमी सहा लाख 29 हजार आले होते. त्यावेळी परीक्षेचा निकाल हा 4.93 टक्के निकाल लागला होता. त्यानंतर 2015 ला निकालात घसरण झाली. 2018-2021 मध्ये झालेल्या परीक्षेंचा निकाल तीन ते चार टक्के लागला. आता 2026 होत असलेल्या परीक्षेचा निकाल 3 ते 5 टक्के लागण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.