Dr. Heena Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Heena Gavit: माजी खासदाराची भाजपला सोडचिठ्ठी ; अपक्ष म्हणून रिंगणात, रघुवंशी विरुद्ध गावित दुसरा राजकीय अंक सुरु

Former BJP MP Heena Gavit Resign BJP: हीना गावित अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढत आहेत. महायुतीतील शिस्त म्हणून गावित यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

Mangesh Mahale

Akkalkuwa Assembly Constituency: ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे पक्षाला अडचण होऊ नये यासाठी मी राजीनामा देत असल्याचे हीना यांनी म्हटले आहे. हीना गावित अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढत आहेत. शिंदे सेनेचे पदाधिकारी भाजपला अर्थातच हीना गावित यांना उघड विरोध करीत आहेत.

शिवसेनेचे नेते, माजी आमदार पक्षाचे धुळे-नंदुरबार संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी आणि भाजपच्या माजी खासदार हीना गावित यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रूत आहे. त्यांचे पडसाद निवडणुकीत उमटत असतात. लोकसभा निवडणुकही त्याला अपवाद ठरली नाही. आता विधानसभा निवडणुकीतही हा वाद कायम असल्याचे चित्र आहे.

भाजपच्या माजी खासदार यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला. अर्ज मागे न घेतल्याने त्यांची उमेदवारी कायम राहिली आहे. त्यामुळे लोकसभेनंतर चंद्रकांत रघुवंशी-गावित या राजकीय नाट्याचा दुसरा अंक सुरु झाला आहे. महायुतीत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने महायुतीतील नेत्यांचे टेन्शन वाढलं आहे.

महायुतीतील शिस्त म्हणून गावित यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. भाजपने आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना नंदुरबारमधून पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यानंतर डॉ. हीना गावित निवडणूक लढणार नाही, असे भाजपच्या पक्षश्रेष्ठींना वाटत होते. पण तसे झाले नाही.

नंदुरबारला जर शिंदेसेनेने भाजपविरुद्ध काँग्रेसचा जो उमेदवार दिला आहे, त्यांनी माघार घेतली तरच आपण अर्ज मागे घेऊ, अशी जाहीर भूमिका मांडत हीना गावित यांनी आपला अक्कलकुव्यातील उमेदवारी अर्ज कायम ठेवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांची मध्यस्थी अयशस्वी ठरली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT