Jalgaon Rural Assembly: दहा वर्षानंतर दोन गुलाबराव आमने-सामने; आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये लढत

Gulabrao Deokar Vs Gulabrao Patil: 2009 मध्ये दोन्ही गुलाबररावांमध्ये लढत झाली होती. त्यात देवकरांनी पाटलांनी धुळ चारली होती. 2014 मध्ये गुलाबराव पाटील विजयी झाले होते. आता 10 वर्षांनंतर पुन्हा हे दोघे बडे नेते रिंगणात आहेत.
Gulabrao Deokar | Gulabrao Patil
Gulabrao Deokar | Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News: उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता. आता विधानसभा निवडणुकीत कुणाचा सामना कुणाशी होणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. कारण दहा वर्षानंतर या मतदारसंघात दोन गुलाबराव आमने-सामने आले आहेत.

जळगाव जिल्ह्याचे आजी-माजी पालकमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यात लढत होत आहे.

2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर समोरासमोर उभे ठाकले आहेत. 2009 मध्ये दोन्ही गुलाबरावांमध्ये लढत झाली होती. त्यात देवकरांनी पाटलांना धुळ चारली होती. 2014 मध्ये गुलाबराव पाटील विजयी झाले होते. आता 10 वर्षांनंतर पुन्हा हे दोघे बडे नेते रिंगणात आहेत. या मतदारसंघातील लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.

Gulabrao Deokar | Gulabrao Patil
Gopal Shetty: फडणवीसांनी ED चा डाव लावताच गोपाळरावांचा आव, ताव अन् भाव कोसळला!

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. विजयी उमेदवाराला मंत्रीपद मिळवून देणारा मतदारसंघ म्हणून जळगाव ग्रामीण मतदारसंघाकडे पाहिले जाते.

2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांचा विजय झाला होता. त्यांना कृषी, परिवहन राज्यमंत्री पद मिळाले होते. 2014 च्या निवडणुकीत गुलाबराव पाटील हे निवडून आले होते. त्यांना सहकार राज्यमंत्री आणि त्यानंतर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रीपद मिळाले आहे.

Gulabrao Deokar | Gulabrao Patil
Gopal Shetty: इरेला पेटलेल्या गोपाळ शेट्टी यांची तलवार म्यान; बोरिवलीमधील बंड विनोद तावडे यांनी शमवलं..

महायुतीचा बालेकिल्ला म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील रावेर आणि अमळनेर हे दोन मतदारसंघ वगळता 9 जागा महायुतीचे पटकावल्या होत्या.

Gulabrao Deokar | Gulabrao Patil
Raju Shetti: मनोज जरांगेंच्या निर्णयाचा फटका राजू शेट्टींच्या परिवर्तन महाशक्तीला बसणार का?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावेर मधून भाजपच्या रक्षा खडसे तर जळगावमधून स्मिता वाघ या विजयी झाल्या आहेत. स्मिता वाघ यांना जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाततून 60 हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com