Nandurbar News: स्वातंत्रपुर्व काळापासून राजकीय वारसा असलेल्या गावित कुटुंबाच्या सर्वपक्षीय राजकारणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ही चर्चा होण्यामागचे कारण म्हणजे या कुटुंबातील चार जण चार वेगवगेळ्या मतदारसंघात वेगवेगळ्या पक्षाकंडून उमेदवारी करीत आहेत.
नंदुरबार मतदारसंघातून डॉ. विजयकुमार गावित हे भाजपतर्फे, शहादा मतदारसंघातून काँग्रेसकडून राजेंद्रकुमार गावित हे आणि नवापूर मतदारसंघातून शरद गावित हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत. तर डॉ. विजयकुमार गावित यांनी कन्या, माजी खासदार हिना गावित या अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातल्या राजकारणात गावित परिवाराचा नेहमीच बोलबाला राहीला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात एकाच कुटुंबातील चार जण वेगवेगळ्या पक्षाकडून विधानसभेच्या रिंगणात उभे ठाकले आहे. चारही उमेदवारांच्या राजकारणीची दिशा जरी वेगळी असली तरी सध्या गावित कुटुंबातील सदस्यांच्या उमेदवारीची चर्चा जोरदार होताना दिसते.
या कुटुंबातील प्रमुख सदस्य असलेले डॉ. विजयकुमार गावित 1995 पासून नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून विजयी होत आहेत. तेव्हापासून दोन चार वर्षाचा काळ सोडला तर मंत्रीपदाची माळही त्यांच्या गळ्यात राहिली आहे. त्यामुळेच त्यांच्या हाती सत्ता आल्यानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात राजकीय सुरुंग लावून अनेक स्थानिक स्वराज्य संस्थासह राजकारणात आपला वलय निर्माण केले.
याच वलयातून त्यांचे कुटंबीय देखील राजकारणात येत गेले.त्यांचे सर्वात लहान बंधून 2009 मध्ये नवापूरमधून आमदारही झाले. तेव्हापासूनच शरद गावित या मतदारंसघात अपक्ष उमेदवारी करीत आहे. यानंतर 2014 आणि 2019 मध्ये डॉ. गावित यांची कंन्या डॉ. हिना गावित खासदार झाल्यात.
आता तर त्यांचे आणखी एक बंधू राजेंद्र गावित देखील शहादा मतदारसंघातूनव रिंगणात आहेत. डॉ. हिना गावित या देखील अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजही मतदारसंघात चारही गावितांची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
दोन भाऊ आमदार असतानाच त्यांचे आणखी एका भावाने मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांची नोकरी सोडून राजकारणा प्रवेश केला होता. सुरवातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा असा प्रवेश करुन त्यांनी देखील आता शहाद्यातून कॉग्रेसने उमेदवारी दिली आहे. 2014 मध्ये त्याचा या मतदारसंघात पराभव झाला होता. मात्र त्यावेळी तिघेही भाऊ आणि आता मुलगी असे चारही मतदारसंघातले समीकरण जुळून आले आहे.
डॉ. विजयकुमार गावितांचे आजोबा स्वर्गीय दामजी पोसल्या गावित हे स्वांतंत्र पुर्व काळात आमदार होते. डॉ. गावितांचे काका स्वर्गीय तुकाराम हुरजी गावित हे देखील स्वातंत्रपुर्व काळात दोनदा खासदार होते. त्यांचे सासरे स्वर्गीय रमेश पान्या वळवी हे दोनदा आमदार आणि गृहराज्यमंत्री देखील राहिले आहेत. तर मेव्हुणे देखील चोपडा मतदारसंघातून आमदार होते.
पक्ष कुठलाही असो, नेता मात्र डॉ. विजयकुमार गावित यांच्या कुटुंबातील असतो. याच राजकारणातून या कुटुंबाला राजकीय झळही सोसावी लागली. या कुटुंबातील सदस्या आज ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, माजी खासदार , मंत्री अशी सारीच पद उपभोगत आहेत. त्यामुळे कुटुंबात मतभेद जरी असले तरीही या कुटुंबातील विधानसभेतल्या दावेदारीने राजकीय पटलवार या कुटुंबाची पुन्हा चर्चा होत आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.