विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यातील वातावरण तापले असताना राजकारणाची पातळी खालवत चालली असल्याचे सध्याचे चित्र आहे. कुत्रा, डुक्कर अशा उपमांनी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये 'कलगीतुरा' सुरु आहे. यामुळे मतदारांचे मात्र चांगलेच मनोरंजन होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर महायुतीच्या घटक पक्षातील नेते सदाभाऊ खोत यांनी केलेल्या विधानामुळे खोतांवर टीका होत आहे. शरद पवार यांच्यावर खोतांनी केलेल्या टीकेवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.
जतमधील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोरच सदाभाऊ खोतांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळी आमदार गोपीचंद्र पडळकरही उपस्थित होते. शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सदाभाऊ खोत यांची पुण्यातील आज पत्रकार परिषद होणार होती. पण ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे.
सांगलीमधील जत येथे आयोजित महायुतीच्या सभेत बोलताना सदा भाऊ खोत यांनी शरद पवारांवर खालच्या शब्दांमध्ये टीका केली. त्यावर "सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. आता सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
सदाभाऊ खोत यांना देवेंद्र फडणवीस यांनी कानाखाली मारायला हवी होती,असे संजय राऊत म्हणाले. राऊत यांनी खोत यांच्याबरोबरच फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. पवारांवर केलेल्या विधानावर खोतांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
संजय राऊत यांना गावगाडा माहिती नाही. त्यामुळे राखण करणारा कुत्रा म्हणजे काय हे त्यांना माहित नाही. तुम्ही २०१४ ला नरेंद्र मोदी यांचा फोटो गळ्यात अडकवून मतांचा जोगवा मागत गावोगावी फिरत होता. २०१९ लाही भाषण करत होता, सत्तेत आल्यावर तुम्ही पहिला खंजीर हातात घेतला. तुमच्यात इमानदारपणा आहे का ते शोधा. कुत्र्याएवढा जरी इमानदारपणा असता तर महाराष्ट्राने तुमचं कौतुक केलं असतं. तरीही मला त्याच्यावर जास्त काही बोलायचं नाही. कारण डुकराला कितीही साबण- शॅम्पू लावला तरी डुक्कर गटारातच जातं...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.