Sangram Bhandare & Amar Thombare  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Warkari Community Protest: वारकरी संप्रदाय मैदानात, भंडारे यांच्या विरोधात गुन्हा का दाखल होत नाही!

Warkari Community Protests Demands FIR Against Bhandare: किर्तनात तासन् तास राजकारणावर भाष्य, हिंदू -मुस्लीम समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये अपेक्षित नाहीच.

Sampat Devgire

Balasaheb Thorat Politics: वादग्रस्त किर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी केलेल्या राजकीय वक्तव्य आणि राजकीय भाष्य वादात सापडले आहे. त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. आता यामध्ये वारकरी संप्रदायाने भंडारे यांना फैलावर घेतले आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या विषयी किर्तनकार भंडारे यांनी वादग्रस्त वक्तव्य करीत राजकारण तापवले. नाशिकच्या अमर ठोंबरे यांनी त्यांचे कान टोचले आहे. स्वतःला कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार म्हणून घेणाऱ्या लोकांची भाषा दुसऱ्याला संपवण्याची असते का?. हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करणे अन् तासन् तास राजकीय विश्लेषण करणे हे किर्तनात अभिप्रेत नाही.

ज्या महात्मा गांधीजींनी सहिष्णुतेचा धडा सबंध राष्ट्राला दिला. भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली त्या राष्ट्रपित्याचा वध करणाऱ्या नथुराम गोडसे यांचे उदातीकरण करून आम्हाला नथुराम व्हावं लागेल, अशी संतापजनक टिप्पणी देणाऱ्या संग्राम बापू विरोधात गुन्हा का दाखल करू नये? असा प्रश्न राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीचे नाशिक जिल्हा प्रमुख प्रा. अमर ठोंबरे यांनी विचारला आहे.

वादग्रस्त किर्तनकार भंडारे यांनी संगमनेर येथील कार्यक्रमात वादग्रस्त विधाने करीत हिंदू-मुस्लीम धर्माविषयी वादग्रस्त विधाने केली. त्यानंतर झालेल्या वादात त्यांनी थेट काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनाच लक्ष्य केले होते. त्यामुळे या विषयावरून राजकारण चांगलेच तापले आहे.

दरम्यान संग्राम बापू भंडारे हे स्वतःच याबाबत खुलासा देत आहेत तसा त्यांनी स्वतःचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. एकीकडे काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना लक्ष्य करून आरोप देखील केला. थोरात यांना उद्देशून "आम्हाला आता नथुराम व्हावं लागेल" अशी टोकाची भाषाही त्यांनी वापरली.

यामध्ये भंडारे यांची एकच बाजू समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. या प्रकरणाबाबत वारकरी संप्रदाय तटस्थ आहे. कुणीही प्रथितयश कीर्तनकार पुढे येऊन याबाबत बोलत नाहीत. याचा अर्थच असा आहे की, कीर्तनामधून अभंग निरूपण करणे, अभंगावर विश्लेषण करणे हे अभिप्रेत असून कीर्तनकारांनी एखादा राजकीय विषय घेऊन त्यावरच तासंनतास बोलणे हे औचित्यपूर्ण नाही. त्यात भंडारे यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे ठोंबरे म्हणाले.

अमर ठोंबरे यांनी पुढे म्हटले आहे की, वारकरी संप्रदायाच्या केंद्रस्थानी समता आहे. बंधूभाव आहे. वारकरी संप्रदाय कधीच कोणत्याही धर्मपरंपरेला विरोध करत नाही. किंबहुना इतर सगळे जाती-धर्म तो आपल्यात सामावून घेतो. संग्राम भंडारे यांसारखे प्रचारकी लोक कीर्तनातून अभंग निरूपण करण्याऐवजी हिंदुत्वाचा अघोरी प्रचार करत आहेत. त्याला अधिक कट्टर आणि कर्मठ बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे कुठेतरी थांबायला हवे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT