Hemlata Patil : काँग्रेसमध्ये माझा मर्डर करण्याचा प्रयत्न.. हेमलता पाटील यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Hemlata Patil : विधानसभेला उमेदवारी नाकारल्याने हेमलता पाटील नाराज होत्या. त्यांनी कॉंग्रेस सोडून शिनसेनेत प्रवेश केला. नंतर शिवसेनेलाही रामराम ठोकला. आता त्या राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत.
Hemlata Patil
Hemlata PatilSarkarnama
Published on
Updated on

Nashik politics : नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात विधानसभेला इच्छुक असूनही तिकीट नाकारल्याने माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, शिंदे गट त्यांना राजकीय दृष्ट्या मानवनार नाही अशी चर्चा होती ती खरी ठरली. अवघ्या दीड महिन्यांत हेमलता पाटील यांनी शिंदे गटाला रामराम ठोकला. आता त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मंगळवार (ता. १९) त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

पक्षप्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलताना हेमलता पाटील यांनी कॉंग्रेस नेत्यांवर काही गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा निवडणुकीत माझे जाणीवपूर्वक तिकीट कापण्यात आले. माझा राजकीय मर्डर करण्याचा प्रयत्न झाला. अपघाताने आपल्यावर अन्याय झाला तर आपण समजू शकतो पण जर कुणी आपला घातपात करत असेल, आपला मर्डर करण्याचाच विषय असेल तर कुठेतरी विचार करावा लागेल असं पाटील यांनी म्हटलं.

त्या पुढे म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीवेळी जे घडलं ते भयंकर होतं. तो माझा राजकीय मर्डरच होता, मला राजकारणातून संपविण्याचा डाव होता. पाच वर्षांपासून मी विधानसभा निवडणूक लढवणार हे ठरवून तयारी करत होते. भाजपची सत्ता असताना देखील माझ्या मतदारसंघात चांगले वातावरण होते. या जागेवर कॉंग्रेस निवडून येईल असा विश्वास असताना नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसने सोडवून घेतली नाही, ती जागा शिवसेनेला सोडून देणं ही घातपातीची भूमिका होती. त्यातून कॉंग्रेसमध्ये आपल्याला भविष्य नसल्याचं लक्षात आल्यानंतर मी पक्ष सोडल्याचं त्यांनी सांगितलं.

Hemlata Patil
Nashik Politics: काँग्रेसवर गंभीर आरोप; शिंदेंच्या शिवसेनेला दीड महिन्यांतच 'जय महाराष्ट्र'; हेमलता पाटील यांचा पुन्हा नवा डाव

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश कसा झाला यांसदर्भात त्यांनी खुलासा केला. त्या म्हणाल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला, त्यावेळी मी प्रवेशासाठी गेले नव्हते. स्थानिक शिवसेना नेत्यांची इच्छा होती की मी शिवसेनेत यावं म्हणून पुढे वाटचाली कशी राहील किंवा शिंदे सेनेत मला कसा प्रतिसाद मिळेल यासंदर्भात केवळ चर्चा करण्यासाठी गेले होते. पण तिथे गेल्यावर वातावरण वेगळच होतं, शिवसेना स्टाईलने माझा प्रवेश झाला, गळ्यात गमछा टाकला गेला. ज्यांनी प्रवेश घडवून आणला ते माझे हितचिंतक होते, त्यांची भावना चांगली होती. त्यामुळे मी त्यावेळी काही बोलू शकले नाही. पण नंतर लक्षात आलं शिवसेनेची काम करण्याची स्टाईल वेगळी आहे ती मला रुचली नाही. याशिवाय अंतर्गत गटबाजी आणि विचारधारेची लढाई असा सगळा विचार करुन मी शिवसेना सोडली असं त्यांनी सांगितलं.

Hemlata Patil
Sanjay Raut : निसाकाचा संघर्ष उफाळला, अनिल कदमांनी साकडं घातलं आता संजय राऊत मैदानात

अजित पवारांसोबतच जाण्याचा निर्णय का?

त्या पक्षाची विचारधारा माझ्याशी जुळते. इतक्या वर्षांपासून फुले- शाहू- आंबेडकर यांचे विचार आम्ही जपत आलो आहोत. पुरोगामी चळवळीचे आहोत. त्यापार्श्वभूमीवर अजित पवारांच्या पक्षात मला चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी मिळेलं असं वाटतं. दादांशी माझं व्यवस्थित बोलणं झालं आहे, त्यांनी मला तशी खात्री दिली आहे असही हेमलता पाटील म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com