CPM leader J. P. Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

J. P. Gavit News: नाराज जे. पी. गावितांची उमेदवारी ठरणार आघाडीसाठी मारक...

Dindori Loksabha election 2024: जे. पी. गावित यांनी निवडणूक लढवली तर ते कोकणा समाजाचे उमेदवार असतील. भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार कोकणा समाजाच्या आहेत.

Sampat Devgire

माकपचे नेते माजी आमदार जे. पी. गावित (J. P. Gavit) यांनी सातत्याने भाजपच्या विरोधात लढा दिला आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi News) प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. लोकसभा निवडणुकीत (Loksabha election 2024) दिंडोरी मतदारसंघ 'माकप'ला मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात ती मागणी मान्य झालेली नाही. त्यामुळे आता नाराज गावित निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.

याबाबत 'माकप'च्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक रविवारी दिवसभर सुरू होती. बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीबाबतची भूमिका मांडण्यात येणार होती. बैठकीत दिंडोरी मतदारसंघाबाबत चर्चा लांबली. आता माजी आमदार जे. पी. गावित येत्या निवडणुकीत दिंडोरीतून (Dindori Loksabha election 2024) उमेदवारी करण्याची शक्यता आहे. त्यांनी उमेदवारी केल्यास पेठ तसेच सुरगाणा कळवण या विधानसभा मतदारसंघात सुमारे एक लाख मते त्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावित यांची उमेदवारी महाविकास आघाडीला फायदेशीर की मारक याची चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिंडोरी मतदारसंघात सुमारे पाच लाख मतदार आहेत. यामध्ये साडेतीन लाख मतदार कोकणा समाजाचे आहेत. एक लाख कोळी समाजाचे आहेत. सध्याच्या स्थितीत भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार कोकणा समाजाच्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे कोळी समाजाचे उमेदवार आहेत. त्यामुळे माजी आमदार जे. पी. गावित हे निवडणूक लढण्यास तेदेखील कोकणा समाजाचे उमेदवार असतील. जे. पी. गावित प्रामुख्याने डॉ. भारती पवार यांच्या सुरगाणा-कळवण मतदारसंघातील आहेत. अशा स्थितीत कोकणा समाजातील मत विभागणी महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडेल. दुसरीकडे कळवण मतदारसंघातील कोकणा मतदारांमध्ये गावित आणि पवार असे दोघे वाटेकरी ठरतील. त्याची झळ भाजपच्या उमेदवाराला बसू शकते.

माकपच्या बैठकीत दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा निर्णय झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ही माहिती पक्षाच्या पॉलिट ब्युरोला कळविण्यात आली आहे. त्याला मंजुरी मिळताच माकपचे स्थानिक नेते पुढील कार्यवाही करतील, अशा स्थितीत दिंडोरी मतदारसंघातून तिहेरी लढतीचे चित्र आहे.

भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीदेखील अपक्ष लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांची नाराजी प्रामुख्याने भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्याविषयी आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत माजी खासदार चव्हाण यांनी उमेदवारी केल्यास भाजपच्या मतांमध्ये आणखी एक वाटेकरी तयार होणार आहे. दुसरीकडे गावित त्यांची उमेदवारीदेखील महाविकास आघाडीपेक्षा भाजपला नुकसान करते की काय? अशी चर्चा सुरू आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT