CM Devendra Fadnavis on Nashik APMC Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik APMC : नाशिकची बाजार समिती बरखास्त; CM फडणवीसांचा महायुतीच्या चुंभळे गटाला मोठा धक्का!

Nashik Market Committee: नाशिक बाजार समितीच्या सत्तेसाठी भाजपचे शिवाजी चुंबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार देविदास पिंगळे यांच्यात राजकीय संघर्ष होता. या दोघांतील पारंपारिक राजकीय संघर्षाचा फायदा संचालकांकडून उठविण्यात आला होता. वर्षापूर्वी पिंगळे समर्थक संचालकांना फोडून चुंबळे यांनी सत्ता हस्तकत केली होती.

Sampat Devgire

Nashik News, 17 Jul : महायुती सरकारने राज्यातील आघाडीची नाशिक बाजार समिती बरखास्त केली. मुख्यमंत्र्यांच्या धोरणात्मक निर्णयाचा भाग म्हणून हा निर्णय झाला. मात्र त्यामुळे नाशिक तालुक्यातील एक महत्त्वाचे राजकीय सत्ताकेंद्र संपुष्टात आले आहे.

नाशिक बाजार समितीच्या सत्तेसाठी भाजपचे शिवाजी चुंबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार देविदास पिंगळे यांच्यात राजकीय संघर्ष होता. या दोघांतील पारंपारिक राजकीय संघर्षाचा फायदा संचालकांकडून उठविण्यात आला होता. वर्षापूर्वी पिंगळे समर्थक संचालकांना फोडून चुंबळे यांनी सत्ता हस्तकत केली होती.

गेली दोन वर्ष नाशिक बाजार समितीत शिवाजी चुंभळे यांची सत्ता होती. या कालावधीत उच्च न्यायालयापासून तर राज्य शासनातील सत्तेपर्यंत चुंबळे आणि पिंगळे यांच्यात राजकीय सत्ता संघर्ष सुरू होता. आता या पारंपारिक राजकारणाला कायमचा ब्रेक लागला आहे.

माजी खासदार पिंगळे यांच्या समर्थक संचालकांचा गट फोडल्यानंतर कल्पना चुंभळे या सभापती झाल्या होत्या. यावेळी पिंगळी यांनी उपसभापती माळेकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचा आरोप केला होता. त्याला चुंभळे यांनी प्रत्युत्तर दिले होते. आरोप प्रत्यारोप यापासून तर शारीरिक मारामारीपर्यंत या दोन्ही गटात बाजार समिती वरून राजकीय संघर्ष सुरू होता.

चुंबळे यांनी प्रदीर्घकाळ बाजार समितीची सत्ता असलेल्या माजी खासदार पिंगळे यांच्यावर मात केली. मात्र पिंगळे यांनी सभापती पदाच्या पडद्यामागे होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा विचार करून सत्ता सहज सोडली होती. त्यात बाजार समिती बरखास्त होणार याचा अंदाज त्यांना होता. त्यात ते राजकीयदृष्ट्या हुशार ठरले, असे चित्र आहे.

बाजार समितीवर आता उपनिबंधक कुंदन भोळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथील प्रशासकीय भवन यापासून तर सोलर प्रकल्प आणि अन्य योजना आता अर्धवट राहणार आहेत. त्याचा फटका चुंबळे यांना समिती बरखास्त झाल्याने बसला. शहरीकरणामुळे नाशिकच्या ग्रामीण भागात बाजार समिती हे सहकारातील एकमेव सत्ता केंद्र होते.

सध्या तरी त्यावर भाजपचे चुंभळे सत्तेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंगळे विरोधात अशी स्थिती होती. त्यामुळे बरखास्त झाल्याची झळही महायुतीच्या या नेत्यांनाच बसली आहे. त्र्यंबकेश्वर येथील युवराज कोठुळे शंकरराव माळेकर संपतराव सकाळी आणि पेठचे भास्कर गावीत हे चार संचालक नाशिकच्या बाजार समितीत कार्यरत होते. आता त्र्यंबकेश्वर आणि पेठ या दोन तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समिती प्रस्तावित करण्यात आली आहे. या बाजार समित्या कितपत सक्षम होतील हा वादाचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT