Gulabrao Patil & Aaditya Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Patil Statement: सरकारची संवेदना गेली कुठे? आगळपगळ बोलणारे गुलाबराव पाटील आदित्य ठाकरेंचा कित्ता गिरवतील का?

Gulabrao Patil Under Fire For Comments Will He Follow Aaditya Thackeray: नाशिकच्या पेठ तालुक्यात उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी महिलांचा जीव संकटात घालावा लागत आहे.

Sampat Devgire

Water Crisis Politics: विरोधकांना सतत उपदेश देणारे महायुती सरकार मधील मंत्री म्हणजे गुलाबराव पाटील. त्यांच्याकडे राज्याचे पाणीपुरवठा खाते आहे. या खात्याची किती दुरावस्था झाली आहे याचे उदाहरण नुकतेच समोर आले आहे.

मंत्री गुलाबराव पाटील हे शिवसेनेतून बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटात गेले. त्यानंतर ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांपासून तर प्रत्येक नेत्याला हिणवत आले आहे. कोणावरही टीका करण्यात त्यांना अजिबात वेळ लागत नाही. हाच पायंडा कामकाजात आहे का? हा मात्र चर्चेचा विषय आहे.

दोन दिवसांपूर्वी बोरीची बारी (ता. पेठ) येथील महिलांना पाण्यासाठी किती संकटांना तोंड द्यावे लागते याचे व्हिडिओ आणि फोटो प्रसिद्ध झाले होते. ही बातमी दिवसभर चर्चेचा विषय होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघातील ही स्थिती होती.

बोरीचीबारी येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी अक्षरशः जीव धोक्यात घालावा लागत आहे. या गावाला टँकरने पाणी मिळावे यामध्ये देखील राजकारण होत आहे. महिला दोरी सोडून आणि अतिशय धोकादायक स्थितीत विहिरीत उतरतात आणि तळ गाठलेल्या विहिरीतून अंडाभर पाणी भरतात.

अशीच स्थिती दोन वर्षांपूर्वी घनशेत (ता. पेठ) येथेही होती. पावसाळ्यात नाल्यावर बांधलेला पूल वाहून गेला. त्यामुळे लाकडी फळी टाकून महिला त्या फळीवरून चालत दुसऱ्या बाजूला पाहण्यासाठी जात होत्या. ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर एकच खळबळ उडाली. उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री होते. मी नंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने संबंधित ठिकाणी भेट देऊन लगेचच बराच बांधण्याचा आदेश दिला होता.

बेरीचीबारी या गावाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर मात्र सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सध्याचे सरकार या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांकडे किती उदासीनतेने पाहते, हे स्पष्ट होते. सरकारमधील राजकीय संवेदनशीलता किती आहे? हा सामान्यांचा प्रश्न आहे.

उठ सूठ प्रत्येकाला हिणवणारे आणि राजकीय टोमणे मारणारे मंत्री म्हणून गुलाबराव पाटील प्रसिद्ध आहेत. विधाने करून चर्चेत राहणे वेगळे आणि जी जबाबदारी सोपविली आहे त्याचे काम करणे ही वेगळी गोष्ट आहे. आजच्या स्थितीवरून तरी गुलाबराव पाटील यांनी यापुढे इतरांना राजकीय उपदेश देण्याऐवजी स्वतःच्या विभागाच्या कामकाजावर लक्ष केंद्रित करणे किती आवश्यक आहे हे स्पष्ट होते. याबाबतीत तरी त्यांनी किमान आदित्य ठाकरे यांचा आदर्श घेतल्यास जनतेसाठी चांगलेच होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT