Mahayuti Government Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahayuti Politics: महायुतीमध्ये बिघाडीचे संकेत; माजी मंत्र्यांनं स्पष्टच सांगून टाकलं...; स्थानिक निवडणुका स्वबळावरच लढणार

Mahayuti Rally Local Body Elections 2025: विजयकुमार गावित यांनी भाजपाच्या पक्ष संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट दिसते. आगामी काळात महायुतीतील मित्रपक्ष विरोधात भाजपा असेच चित्र निर्माण होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

सागर निकवाडे

Nandurbar Politics, 21 Apr 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच महायुतीत संघर्ष होण्याचे चित्र आहे. नंदुरबार जिल्ह्यात महायुतीचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या मित्रपक्षांसोबत युती न करण्याची घोषणा भाजपाचे नेते माजी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी कार्यकर्त्या मेळाव्यात केली आहे.

नंदुरबार तालुका भाजपा अध्यक्ष निवडीच्या वेळी आमदार विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यकर्ता मेळाव्यात मित्र पक्षांवर महायुतीच्या विरोधात काम करत विरोधकांना मदत केल्याचा आरोप माजी मंत्री विजयकुमार गावित यांनी केला आहे.

येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपा स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

माजी मंत्री विजयकुमार गावित यांनी भाजपाच्या पक्ष संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट दिसते. काळात महायुतीतील मित्रपक्ष विरोधात भाजपा असेच चित्र निर्माण होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.

आम्ही युतीबिती करणार नाही, असे आजच सांगतो. आमच्या मतदारसंघात युती करणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री युती करणार असल्याचे सांगतात, अन् नंतर विरुद्ध प्रकार करतात, आम्ही त्यांना मदत करायची ही भूमिका चुकीची आहे. आम्ही ग्रामपंचायत, नगरपालिका महापालिकेच्या आम्हीच निवडून येऊ, असे ठामपणे त्यांनी सांगितले.

नंदूरबार जिल्ह्यातून युतीचा विचार काढून टाका, तुम्ही तुमचं काम करा, आमचं काम सुरु झाले आहे, असे महायुतीच्या नेत्यासमोरच गावित यांनी सांगून टाकले. त्यामुळे यावेळी उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT