Controversial reel with young girls Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik crime: पोलीस मैदानात उतरताच हॅशटॅग नाशिककर म्हणणाऱ्या युवतींचा काही मिनिटांत यू टर्न, क्षमा याचना करीत पोलिसांची टॅग लाईन म्हटली...

Nashik Police Action on Reel Star: नाशिकच्या दोन युवतींनी "डेड बॉडी डायरेक्ट सिव्हिल हॉस्पिटलला भेटेल" अशी धमकीवजा रील व्हायरल केली होती.

Sampat Devgire

Nashik crime News: नाशिक शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिस किती ॲक्टिव्ह आहेत, याचा अनुभव नुकताच आला. रील बनविण्याच्या मोहातून दोन युवतींना त्याचा अनुभव आला. पोलिसांचा 'प्रसाद' मिळतात त्या गयावया करू लागल्या.

समाज माध्यमांचा वाढता प्रभाव युवा पिढीला कोणत्या थराला नेतो याचा अनुभव नाशिककरांना नुकताच आला. दोन युवतींनी रामकुंडावर एक रील बनवली. यामध्ये त्यांनी चक्क लेडी डॉन असल्याच्या अविर्भावात धमकी दिली.

ही रील सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याला नेटकऱ्यांनी समाचार घेणाऱ्या प्रतिक्रीया दिल्या होत्या. या रीलची भाषा थेट गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी होती. त्यामुळे सध्या गुन्हेगारीच्या विरोधात ॲक्टिव्ह असलेल्या पोलीस यंत्रणेच्या नजरेतूनही ते सुटले नाही.

'हे नाशिक आहे भावा इथे जर तू इज्जत दिली, तर तुला इज्जत मिळेल. नाहीतर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिविल हॉस्पिटल ला भेटेल. हॅशटॅग नाशिककर'असे या युवती त्यात म्हणत होत्या. त्याच्याही पुढे जात "समझनेवाले को इशारा काफी है नाद नाही करायचा माऊली नाहीतर ताणून मारील ताणून"असे या रील मध्ये म्हटले होते.

पोलीस यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. देवळाली कॅम्प येथील पायल पठारे आणि गौरी पवार या युवतींना पोलिसांनी काही वेळातच ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यावर आपल्या खास शैलीत त्यांचा पाहुणचार केला.

पोलिसांच्या कारवाईने गर्भगळीत झालेल्या या युवती अवघ्या काही मिनिटात जमिनीवर आल्या. त्यानंतर त्यांनी अशा प्रकारचे रील बनवून गुन्हा केला आहे. हा असा गुन्हा करणार नाही. मला क्षमा करावी, असे म्हणत "नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला" या नव्या टॅगलाईन म्हणत क्षमा याचना केली.

कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगाराची मिरवणूक काढून 'नाशिक जिल्हा, गुन्हेगारीचा बालेकिल्ला'अशा घोषणा काही युवकांनी दिल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणूनच पोलीस आयुक्त मैदानात उतरले होते. आता त्या मार्गाने निघालेल्या या युवती अवघ्या काही मिनिटात यू टर्न घेऊन परतल्या आहेत. पोलिसांच्या कारवाईचा दणका या निमित्ताने बघायला मिळाला.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT