Sanjay Raut News: नाशिक शहरातील राजकीय गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम राबवली. ही कारवाई राज्यभर चर्चेचा विषय आहे. यानिमित्ताने त्याला राजकीय अँगल देण्याचा प्रयत्न होत आहे.
नाशिक शहरात गेल्या सहा महिन्यात ४६ हुन अधिक खून झाले होते. समाज माध्यमांवर गुन्हेगारांकडून उघडपणे गुन्हेगारीचे समर्थन होऊ लागले होते. त्यामुळे शहरातील नागरिक संतप्त होते. त्याची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेली होती.
गुन्हेगारांना राजाश्रय मिळाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट होती. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कारवाईच्या सूचना केल्या. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यासंदर्भात मोठा ड्राईव्ह राबवला.
या कारवाईची भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे, बाळासाहेब पाटील यांसह तीन नगरसेवकांना झळ बसली. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी भाजप पक्षात प्रवेश केलेले सुनील बागुल यातून सुटले नाही. त्यांच्या दोन्ही पुतण्यांवर आणि सहकाऱ्यांवर पोलिसांनी गंभीर कारवाई केली.
‘आरपीआय’चे उत्तर महाराष्ट्र प्रमुख निकटवर्तीय प्रकाश लोंढे, त्यांचे दोन्ही मुलगे भूषण आणि दीपक त्यांच्यावर देखील पोलिसांनी कारवाई केली. शिवसेना शिंदे पक्षाचे वादग्रस्त माजी नगरसेवक पवन पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे ते फरारी आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या या धडक कारवाईचे सगळीकडे स्वागत झाले.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही नाशिकच्या पोलिस आयुक्तांचे कौतुक केले आहे. आयुक्तांनी राजकीय गुन्हेगार आणि शहरावर दरोडे घालणाऱ्या नेत्यांना वठणीवर आणले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना कारवाईची पूर्ण मोकळीक दिली आहे.
पोलिसांनी कोणताही भेद न करता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सत्ताधारी भाजपच्या गुंडांवर कारवाई केली. अलीकडच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांनाही सोडले नाही. जनतेला छळणाऱ्या आणि शहरात राजकीय दरोडेखोरी करणाऱ्या नेत्यांना दयामया दाखवली नाही.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. त्यामुळे राजकीय गुन्हेगारांना वचक बसेल. अशीच कारवाई ठाणे शहरात व्हायला हवी. पुण्यासह अन्य शहरे त्याला अपवाद नाहीत. अशी गुगली ही राऊत यांनी टाकली. त्यामुळे नाशिकच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्याची संधी राऊत यांनी साधली.
--------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.