Malegaon Blast case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon Bomb Blast case: मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील अडथळा दूर, न्यायाधीशांच्या बदलीला स्थगिती!

Malegaon Blast; Transfer of judge in Malegaon bomb blast case finally stayed -मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश लाहोटी यांची बदली झाली होती.

Sampat Devgire

Malegaon blast Case News: गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील आणि राज्यातील विविध न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या होत्या. यामध्ये मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची ही बदली झाली होती. त्यामुळे या खटल्याच्या सुनावणीत विलंब होण्याची शक्यता होती.

या संदर्भात मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश लाहोटी यांची नुकतीट नाशिकला अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून बदली झाली होती. या बदलीने न्यायालयाच्या सुनावणीवर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे याबाबत खटल्याशी संबंधीतांनी चिंता व्यक्त केली होती.

या प्रकरणात मृत झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांनी याबाबत पुढाकार घेतला होता. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. या खटल्याची सुनावणी येत्या काही दिवसात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

मालेगाव शहरातील मशीदीबाहेर २००८ मध्ये सायकलीमध्ये स्फोटके ठेऊन बॉम्बस्फोट करण्यात आले होते. मुस्लीमाच्या सणाच्या दिवशीच हे स्फोट करण्यात आला होता. या स्फोटाचा तपास एक आव्हान होते. मात्र पोलीसांनी हे गुढ उकलले व राजकीय पक्षांशीसंबंधीत हा कट उघडकीस आणला होता.

या संदर्भात मृताच्या कुटुंबीयांनी खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश लाहोटी यांची बदली थांबवावी अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेण्यात आली. न्यायाधीश लाहोटी यांच्या बदलीला 31 ऑगस्ट पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे मालेगाव खटल्यातील सुनावणीतील विलंब दूर झाला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी गेली १८ वर्षे सुरू आहे. २००८ मध्ये मालेगाव मध्ये मशिदी बाहेर स्फोट घडून आणण्यात आले होते. भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर आणि कर्नल पुरोहित हे यातील प्रमुख आरोपी आहे. सध्या ते जामिनावर आहेत.

----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT