Jalgaon crime: जळगाव शहरात धक्कादायक बाब पुढे आली आहे. खुद्द पोलीस उपनिरीक्षक हाच चोऱ्या करणाऱ्या टोळीचा म्होरक्या निघाला. पोलीस अधिकारीच चोरांच्या टोळीचा बॉस निघाल्याने खळबळ उडाली आहे.
जळगाव पोलिसांना एका तपासात धक्कादायक माहिती मिळाली. बस स्थानकावर प्रवाशांच्या बॅगांची चोरी झाली होती. चोरी करून संबंधित गाडीने फरार झाला होता. मात्र तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला आणि तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनाच भोवळ येण्याची वेळ आली.
हा चोर नियमितपणे आपल्या सहकाऱ्यांसह जळगाव तसेच अन्य बस स्थानकांवर चोऱ्या करीत असल्याचे आढळले आहे. दिवसांपूर्वी तो जळगाव बस स्थानकावरून प्रवाशांची चोरी करून आपल्या गाडीने पसार झाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. प्रदीर्घकाळ पाठलाग केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतल्यावर चौकशी करताना मात्र पोलिसांनाच भोवळ यायची राहिली. चोरांच्या टोळीचा हा म्होरक्या दुसरा तिसरा कोणी नसून पोलीस अधिकारीच निघाला. प्रल्हाद पिराजी मांटे (वय ५७) हा जालना पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. तो येत्या तीन महिन्यांनी निवृत्त होणार होता.
त्याची चौकशी केली असता पोलीस तपासात धक्कादायक बाब पुढे आली. जालना पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्याने चोरांची एक टोळी तयार केली होती. या टोळीने जळगाव तसेच अन्य ठिकाणी बस स्थानकांवर आणि वरदळीच्या ठिकाणी चोऱ्या करण्याचे काम सुरू ठेवले होते. या टोळीचा बॉस खुद्द पोलीस अधिकारीच असल्याने ही टोळी निर्धारस्तपणे चोऱ्या करीत असे.
दोन दिवसांपूर्वी चोपडा बस स्थानकावर वसंत उखा कोळी या शेतकऱ्याचे ३५ हजार रुपये चोरी झाले होते. पोलीसांनी त्याबाबत पाळत ठेवली होती. त्यांनी चोरांच्या कारचा (एम एच ४३ एन २९२८) पाठलाग केला. गाडीसह चोरांना ताब्यात घेतले. त्यात पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मांटे (जालना), श्रीकांत भिमराव बघे (खामगाव), अंबादास सुखदेव साळगावकर (अकोला), अहमद शेख (बीड) या टोळीला अटक करण्यात आली.
पोलीस दलात काम करून गुन्हेगारीवर नियंत्रण करणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात मात्र नीतिमत्ता ढासळलेले लोक या वर्दीला डाग लावण्याचे काम करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक मांटे यांनीही तेच केले. तो पोलीस अधिकारी असल्याचे आढळल्यावर पोलिसांनाच धक्का बसला. जळगाव मध्ये सध्या हा विषय चर्चेचा बनला आहे.
------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.