Malegaon_Crime_News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon crime: धक्कादायक, मालेगावात 'कलेक्टर'ची चक्क मर्सिडीज! पंतप्रधान कार्यालयाशी संपर्काचा दावा!

Malegaon crime; Impersonator District Collector was giving jobs, police took him into custody-मालेगाव शहरात अनेक दिवस तोतया जिल्हाधिकारी रुबाबात फिरत वाटत होता सरकारी जमिनी आणि सरकारी नोकऱ्या

Sampat Devgire

Malegaon News: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पूजा खेडकर बीएमडब्ल्यू मुळे चर्चेत आल्या होत्या. मालेगावातही असेच प्रकरण समोर आले आहे. यामध्ये चक्क जिल्हाधिकारी मर्सिडीज वापरत असल्याचे आढळले आहे. आता तो पोलिसांचा पाहुणचार घेत आहे.

मालेगाव शहर सध्या बनावट दाखले आणि विविध प्रकारांमुळे चर्चेत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकार चर्चेत आणले. शहरातील हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये चक्क भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असल्याचे भासवून कारभार सुरू होता.

मालेगाव शहरात गेले काही दिवस जिल्हाधिकारी असल्याचे भासवून एका तोतयाचे कामकाज सुरू होते. जिल्हाधिकार्यालयालगत एका उच्चभ्रू वसाहतीत राहून हे सर्व कामकाज बिनदिक्कत सुरू असल्याचे आढळले. संबंधित तोतया जिल्हाधिकाऱ्याला मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्ती आपण जिल्हाधिकारी आहोत, असे सांगून राजकीय नेते आणि नागरिकांची संपर्कात होता. त्यासाठी तो अनेकांना जेवणावरही देत असल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकारे ओळखी वाढवून रिंकल नरेश रजक उर्फ अब्दुल रहमान याने आपले जाळे विणले होते.

'डीसी' असे लिहिलेल्या मर्सिडीज कारमधून त्याचा वावर होता. रिंकल नरेश रजक उर्फ अब्दुल रहमान असे या तोतयाचे नाव आहे. त्याने अनेकांना सरकारी नोकऱ्या देण्याचे अमिष दाखवले. त्यासाठी पैसेही गोळा केले. मालेगाव शहरात घरांचा प्रश्न बिकट आहे. हे लक्षात आल्यावर त्याने अनेकांना सरकारी जमीन वितरित करण्याचे आश्वासने दिली. त्या बदल्यात प्रत्येकाकडून सव्वा लाख रुपयांची वसुली केली.

या संदर्भात नागरिकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर संबंधिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या घराच्या झडतीत मोठ्या प्रमाणावर ८.५० लाखांची रोकड सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बीएमडब्ल्यू गाडीतून वावर असल्याने पूजा खेडकर हिचे बिऺग फुटले होते. तसेच महागड्या मर्सिडीज गाडीतून वावर असल्याने या तोतया जिल्हाधिकाऱ्याचे बिंग फिटले आहे. आपण जिल्हाधिकारी आहोत. आपले थेट पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क असल्याचे तो सगळ्यांना सांगत होता. आता पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहे.

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT