Sadhvi Pradnyasingh Politics: साध्वी प्रज्ञासिंगला समाजवादी पार्टीचा झटका! काय आहे प्रकरण?

Sadhvi Pragya Singh banned in Malegaon: मालेगाव येथे होणाऱ्या संत संमेलनास उपस्थित राहण्यास प्रज्ञा सिंग यांना मनाई केल्याचा दावा.
Sadhwi Pradnyasingh
Sadhwi PradnyasinghSarkarnama
Published on
Updated on

Pradnya Singh News: मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील संशयित माजी खासदार प्रज्ञा सिंग पुन्हा एकदा चर्चेत आहे. मालेगाव शहरात होणाऱ्या हिंदू संत संमेलनामुळे हा वाद निर्माण झाला. यानिमित्ताने शहरातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत.

मालेगाव शहरात गुढीपाडव्याला येत्या 30 मार्चला हिंदू संत संमेलन होणार आहे. याच दिवशी रमजान ईद देखील आहे. या दिवशी हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्मियांचे उत्सव एकाच दिवशी आहेत. संत संमेलनात देशभरातील विविध साधू सहभागी होतील. हिंदुत्ववादी संघटनांच्या पुढाकाराने हे संमेलन होत आहे. त्याला सध्याच्या मालेगाव शहरातील राजकीय पार्श्वभूमी आहे.

Sadhwi Pradnyasingh
Sanjay Raut Politics: संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले, ‘दंगलखोरांची बाजू घेऊ नका’

यासंदर्भात समाजवादी पक्षाने साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या मालेगाव येथील दौऱ्याला विरोध केला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन साध्वी प्रज्ञा सिंग यांना मालेगाव शहरात येऊ देऊ नये, अशी त्यांची मागणी होती. या मागणीला यश आल्याचा दावा समाजवादी पक्षाने केला आहे.

Sadhwi Pradnyasingh
Devendra Fadnavis Politics : नाशिक जिल्हा बँकेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना कर्मचाऱ्यांचे साकडे !

साध्वी प्रज्ञा सिंग या २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. यासंदर्भात गेली काही वर्ष न्यायालयात खटला सुरू आहे. त्याला आता वेगळे वळण देखील लागले आहे. पार्श्वभूमी असल्याने समाजवादी पक्षाचे मुश्तकीम डिग्निटी यांनी साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या मालेगाव दौऱ्याला विरोध केला होता.

यासंदर्भात साध्वी प्रज्ञा सिंग यांचे वकील जे. पी. मिश्रा यांनी न्यायालयात संत संमेलनास जाणार नाहीत, असे कळविल्याचा दावा केला जातो. साध्वी प्रज्ञा सिंग प्रयागराज येथील कुंभमेळ्याला देखील गेल्या नव्हत्या. पार्श्वभूमीवर त्यांची मालेगाव संत संमेलनास उपस्थिती अनिश्चित आहे.

हिंदू संत संमेलनाचे आयोजक मच्छिंद्र शिर्के यांनी भोपाळ येथे जाऊन साध्वी प्रज्ञा सिंग यांना संमेलनाचे निमंत्रण दिले होते. या संमेलनात त्यांना हिंदूवीर पुरस्कार दिला जाणार होता. या पार्श्वभूमीवर आता साध्वी प्रज्ञा सिंग यांना चांगलाच झटका बसला आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com