Malegaon Fake Birth Certificates  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon Fake Birth Certificates : देशाच्या सुरक्षेवर घाला ! मालेगावच्या फरार नायब तहसीलदारांना पत्नीसह अटक

Bangladeshi infiltration, fake birth certificates case leads to arrest of Malegaon Deputy Tehsildar and wife : मालेगावात बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांनी बनावट जन्मदाखले बनवल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यानंतर शासनाने एसआयटी स्थापन करत याप्रकरणी चौकशी सुरु केली.

Ganesh Sonawane

Kirit Somaiya Malegaon : मालेगावात बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांनी बनावट जन्मदाखले बनवल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यानंतर शासनाने एसआयटी स्थापन करत याप्रकरणी चौकशी सुरु केली. त्यानंतर येथील बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले प्रकरणात अनेक अधिकारी व नागरिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांना बनावट जन्म दाखला तयार करुन दिल्याप्रकरणी नायब तहसीलदार संदीप धारणकर व त्यांच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल झाला होता. परंतु त्यानंतर अटक होण्याच्या भीतीने धारणकर दांपत्य फरार झालं. फरार धारणकर दांपत्याला नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला. एकुण 1,044 नागरिकांना महापालिका व तहसील कार्यालयातून बनावट कागदपत्रांवर जन्म दाखले मिळवल्याचा आरोप त्यांनी केला. काही प्रकरणांमध्ये हे दाखले थेट महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले, असून तहसील कार्यालयात याची कुठेही नोंद नाही असं सोमय्या यांनी सांगितलं. सध्या एसआयटी मार्फत याप्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. जन्मदाखले प्रकरणी येथील छावणी पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा ३१ जानेवारीला दाखल झाला होता.

बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या जन्मदाखल्यांच्या प्रकरणाच्या चौकशीत महापालिकेतील लिपिक ते तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांचाही सहभाग असल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात येथील नायब तहसीलदार संदीप धारणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे, आर्थिक व्यवहार त्यांच्या पत्नी दीपाली धारणकर यांच्या बँक खात्यावर झाल्याचे समोर आल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला होता

गेल्या काही महिन्यांपासून हे दोघे फरार होते. अखेर छावणी पोलिसांनी त्यांना नाशिकमध्ये ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना २३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात आतापर्यंत ५० हून अधिक व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी काहींना जामीन मिळालेला असला तरी बहुतांश आरोपी अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT