Firing  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon Firing : मालेगाव गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट ; 'एमआयएम'च्या माजी महापौरांबाबत धक्कादायक माहिती समोर

AIMIM Vs NCP News : विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एमआयएमने अनेक डावपेच आखले होते. यामध्ये प्रसिद्धीचा स्टंट करून माजी आमदार आणि प्रतिस्पर्धी उमेदवार असिफ शेख यांना अडचणीत आणण्याचा जोरदार प्रयत्न झाला. मात्र हे सर्व प्रयत्न आता एमआयएमच्या अंगलट आले आहेत.

Sampat Devgire

Malegaon News : 'एमआयएम'चे शहराध्यक्ष नदी फिटर यांच्या घरावर झालेला गोळीबार आता राजकीय वादाचा विषय ठरला आहे. याप्रकरणी स्वतः नदीम फिटर यांसह 'एमआयएम'चे (AIMIM) विविध नेते पोलिसांच्या रडावर आले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या वातावरण निर्मितीसाठी केलेले षडयंत्र या पक्षाच्या अंगलट आले आहे.

विधानसभा निवडणूक (Assembly Election) जिंकण्यासाठी एमआयएमने अनेक डावपेच आखले होते. यामध्ये प्रसिद्धीचा स्टंट करून माजी आमदार आणि प्रतिस्पर्धी उमेदवार असिफ शेख यांना अडचणीत आणण्याचा जोरदार प्रयत्न झाला. मात्र हे सर्व प्रयत्न आता एमआयएमच्या अंगलट आले आहेत.

या प्रकरणातील फिर्यादी आणि ज्याच्या घरावर गोळीबार झाला. ते माजी नगरसेवक नदीम फिटर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस तपासात माजी नगरसेवक फिटर यांनी स्वतःच हे प्रकरण घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता त्यांचे अनेक सहकारी अडचणीत आले आहेत.

'एमआयएम' चे माजी महापौर अब्दुल मलिक इसा यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने माजी महापौर ईसा फरार झाले आहेत. आता त्यांचा शोध घेतला जात आहे.

मालेगाव मध्य विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी आमदार असिफ शेख हे अवघ्या दीडशे मतांनी पराभूत झाले होते एमआयएमचे विद्यमान आमदार मौलाना यांना या मतदारसंघातून विजयी घोषित करण्यात आले ही विधानसभा निवडणूक अनेक आरोप प्रत्यारोप आणि डावपेच यामुळे चर्चेत राहिली.

आता याबाबत माजी आमदार आसिफ शेख चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत बागे मेहमूद भागात झालेल्या गोळीबार आणि माजी नगरसेवक नदीम फिटर या संदर्भात गंभीर आरोप केले आहेत. ज्याने तक्रार केली त्यानेच स्वतःवर गोळीबार घडवून आणले होते. आझाद नगर पोलिसांनी या प्रकरणातील मूळ आरोपींना शोधून काढावे. माजी महापौर अब्दुल मलिक इसा यांचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याने त्यांना अटक करावी, अशी मागणी माजी आमदार शेख यांनी केली आहे.

याबाबत राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन दोषींवर कारवाईची मागणी केली जाणार आहे. माजी आमदार शेख याबाबत आक्रमक आहेत आपल्याला खोट्या राजकीय कारस्थानाचा बळी करण्यात आले यामुळे ते अधिकच संतप्त झाले आहेत माजी सभागृह नेते असलम अन्सारी शकील जानी बेग यांस विविध शेख समर्थक यावेळी उपस्थित होते.

एकंदरच मालेगाव येथील गोळीबार प्रकरणावरून माजी आमदार असिफ शेख आणि विद्यमान आमदार मौलाना यांचे समर्थक एकमेकांविरोधात सरसावले आहेत. यामध्ये आमदार मौलाना हे मात्र अद्याप शांत आहे. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. एकंदरच एम आय एम या प्रकरणाने उघडे पडले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांतील राजकीय धार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT