Assembly Election : महायुतीची ‘लाडकी बहीण’ काँग्रेससाठी झाली ‘प्यारी दीदी’; दिल्लीत मोठी घोषणा...

Ladki Bahin Yojana Pyari Didi scheme Congress : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महिलांसाठी प्यारी दीदी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.
Pyari Didi Yojana
Pyari Didi YojanaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना सुरू केली अन् निवडणुकीत मतांचा वर्षाव झाला. त्यानंतर आता काँग्रेसलाही या योजनेची भुरळ पडली आहे. पक्षाने दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी ही योजना जाहीर केली आहे. लाडकी बहीण ऐवजी प्यारी दीदी असे काँग्रेसने म्हटले आहे.

दिल्लीत काँग्रेसची सत्ता आल्यास प्यारी दीदी योजना सुरू करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना अडीच हजार रुपये दिले जाणार आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीत या योजनेची घोषणा केली. राज्यात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ही योजना कर्नाटकातील योजनेचे मॉडेल असल्याचे तेही म्हणाले.

Pyari Didi Yojana
India Gate Name Change : ‘इंडिया गेट’चे नाव बदलण्याची भाजप नेत्याची मागणी; थेट मोदींना पत्र लिहून सुचवलं खास नाव...

आप सरकारचीही योजना

आम आदमी पक्षाचे दिल्लीत सरकार आहे. या सरकारने यापूर्वीच महिलांसाठी दरमहा 2100 रुपये देण्याची योजना जाहीर केली आहे. त्याला महिला सन्मान योजना असे नाव देण्यात आले आहे. त्यासाठी अर्ज भरण्यासही सुरूवात करण्यात आली आहे. मात्र, निवडणुकीनंतरच दिल्लीतील महिलांना आपच्या या योजनेचा फायदा मिळू शकतो.

आपच्या योजनेवरून वाद

आपने जाहीर केलेल्या योजनेवरून वाद निर्माण झाला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांनी जाहीर केलेल्या या योजनेला सरकारची अधिकृत मान्यता नसल्याचे संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे. त्यावरून सध्या राजकारण तापले आहे. मात्र, तसे असले तरी सत्ता कुणाचीही येऊद्यात महिलांना दरमहा दोन हजारांहून अधिक रुपये मिळणार, हे निश्चित.

Pyari Didi Yojana
India Gate Name Change : ‘इंडिया गेट’चे नाव बदलण्याची भाजप नेत्याची मागणी; थेट मोदींना पत्र लिहून सुचवलं खास नाव...

भाजपही योजना आणणार

महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतही महिलांसाठी लाडकी बहीण योजनेप्रमाणे योजना सुरू करण्याचे आश्वासन भापकडूनही दिले जाऊ शकते. हरियाणा, काश्मीर, झारखंडमध्येही भाजपने अशाच घोषणा केल्या होत्या. अद्याप भाजपकडून जाहीरनामा प्रसिध्द केलेला नाही. जाहीरनाम्यामध्ये अशा योजनेचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com