Kirit Somaiyya & Mayor Nasrin Bano Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon Politics: मालेगावच्या महापौरांनी केली सोमय्या यांची नाकेबंदी; महिला महापौरांच्या आव्हानाने किरीट सोमय्यांची होणार राजकीय कोंडी!

Malegaon Mayor blocks Kirit Somaiya visit: मालेगावच्या महापौरांनी केली सोमय्या यांची नाकेबंदी; महिला महापौरांच्या आव्हानाने किरीट सोमय्यांची होणार राजकीय कोंडी!

Sampat Devgire

Malegaon civic politics latest controversy: भाजपच्या राजकीय धोरणाचा भाग म्हणून किरीट सोमय्या मालेगाव शहराला सातत्याने टार्गेट करत आले आहेत. मात्र आता त्यांची राजकीय वाट अवघड होण्याची चिन्हे आहेत. महापौरांनी सोमय्या यांची नाकेबंदी करण्याची व्यवस्था केली आहे.

मालेगाव शहरातील तीन हजार जन्म दाखले विविध कारणांनी रद्द करण्यात आले आहे. हे दाखले बनावट असल्याचा दावा भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करून संबंधित दाखले रद्द करण्यात आले.

नुकत्याच झालेल्या मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत हा प्रमुख राजकीय मुद्दा बनला होता. इस्लाम पक्षाने याबाबत भाजप आणि एमआयएम या दोन्ही पक्षांवर गंभीर टीका केली होती. निवडणुकीत माजी आमदार असिफ शेख यांच्या इस्लाम पक्षाला सर्वाधिक जागा मिळून तो सत्तेत आला.

या पार्श्वभूमीवर शहराचे राजकारण तापविण्यासाठी किरीट सोमय्या मालेगावला येणार आहेत. यावेळी ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेणार आहे. बैठकीलाच महापौर नसरीन बानू यांनी आव्हान दिले आहे.

महापौर नसरीन बानू यांनी महापालिकेचे आयुक्त रवींद्र चव्हाण यांना पत्र दिले आहे. किरीट सोमय्या यांना महापौर अथवा महासभा यांच्या परवानगी खेरीज कोणतीही माहिती देण्यात येऊ नये. महापालिकेला या संदर्भात कायदेशीर अधिकार असून त्याचा उपयोग करावा.

महापौर नसरीन बानू यांनी किरीट सोमय्या यांच्या राजकारणाला थेट आव्हान दिले आहे. मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान राहतात असा आरोप सोमय्या यांनी केला होता.  हा आरोप ते अद्याप सिद्ध करू शकलेले नाही.

गेल्या आठवड्यात नाशिक महापालिकेतही सोमय्या यांनी असेच अतिउत्साही विधान केले होते. मुंबईत रेल्वे स्थानकांच्या परिसरात ऐंशी टक्के बांगलादेशी मुस्लिम फेरीवाले असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यावरून अण्णा चांगलेच बॅक फुटवर जावे लागले होते.

आता सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्याला महापौर नसरीन बानु आणि इस्लाम पक्षाचे माजी आमदार असिफ शेख यांनीही उघड विरोध केला आहे. सोमय्या यांच्याकडे कोणते वैधानिक पद किंवा अधिकार आहेत?. कोणत्या अधिकारात ते सरकारी कार्यालयात व अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात? असा प्रश्न करून सोमय्या यांना मालेगाव मधून मोठे आव्हान देण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT