Onion Tax Reduced: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! निर्यातीवरील 'रोड टेप' सवलत घटवली; शेतकऱ्यांवर काय होणार परिणाम?

Onion Tax Reduced: कांद्याचे भाव गडगडल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज नाशिकच्या चांदवड इथं आमरण उपोषणाची हाक दिली. कांद्याला ३,००० रुपये हमीभावाची मागणीही करण्यात आली आहे.
onion farmers protest
onion farmers protestSarkarnama
Published on
Updated on

Onion Road Tape Tax Reduced: कांद्याचे भाव गडगडल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज नाशिकच्या चांदवड इथं आमरण उपोषणाची हाक दिली. कांद्याला ३,००० रुपये हमीभावाची मागणीही करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकीकडं कांद्याला भाव मिळावा म्हणून शेतकऱी आक्रमक झालेले असताना दुसरीकडं केंद्र सरकारन या उत्पादकांना फटका बसेल असा मोठा निर्णय घेतला आहे. कांदा निर्यातीवरील रोड टेप सवलत सरकाऱकडून घटवण्यात आली आहे. याचा शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होणार असल्याची चिन्ह आहेत.

onion farmers protest
PMC News : पुणे महापालिकेच्या विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध; भाजपकडून महिलांना जास्तीत जास्त संधी

सरकारनं नेमकं काय केलंय?

केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील 50 टक्के रोड टेप सवलत घटवली आहे. म्हणजे आत्तापर्यंत कांदा निर्यातीवर 1.9 टक्के प्रोत्साहनात्मक निधी देण्यात येत होता. तो आता 0.95 टक्केच मिळणार आहे. कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी रोड टेपची सवलत देण्यात येत होती. पण ही सवलतच आता निम्म्यानं घटवण्यात आल्यानं याचा फटका कांदा निर्यात आणि कांदा प्रक्रिया उद्योगांना बसण्याची शक्यता आहे. तात्काळ प्रभावानं हा निर्णय लागू होणार आहे.

onion farmers protest
Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाविरोधात परभणीत एवढा भडका का? शेतकऱ्यांमध्ये इतका असंतोष का? जाणून घ्या सविस्तर

सध्या नाशिकच्या मार्केटमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरु आहे. त्यामुळं ९०० ते १००० रुपये असा कवडीमोल भाव शेतकऱ्यांना मिळतो आहे. यामुळं उत्पादकांचा उत्पादन खर्च देखील वसूल होत नाहीए. त्यामुळं निर्यातीसाठी देण्यात येणारी सवलतच घटवण्यात आल्यानं शेतकरी कांदा निर्यातीसाठी इच्छुक असणार नाही. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर कांद्याचा पुरवठा देशांतर्गत किंबहुना महाराष्ट्राच्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाल्यानं कांद्याचे भाव आणखीनच घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळं ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा ठरला असला तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र हा मोठा फटका असेल.

onion farmers protest
RTI Information: माहिती अधिकाराच्या माध्यमातून पत्नी आपल्या पतीचा पगार किती? हे जाणून घेऊ शकते का? कोर्टानं काय दिला निर्णय

दरम्यान, चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. यावेळी उपोषणकर्त्यांनी कांदा लिलाव बंद करण्याचे आवाहन केलं आहे. पण आधीच काद्यांचे दर घटल्यामुळं त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडण्यास विरोध दर्शविला. कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये हमीभाव, विक्री झालेल्या कांद्याला 1,500 रुपये प्रति क्विंटल अनुदान तसंच कांदा निर्यातीसाठी वाहतूक अनुदान व रेल्वे सुविधा उपलब्ध करून द्यावीत, अशा मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी केल्या. तसंच मका हमीभावाची खरेदी मर्यादा वाढवून याचं पेमेंटही तात्काळ जमा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसंच सातबारा पिकनोंद अट शिथिल करावी, अशी मागणीही यावेळी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com