Bjp-Kirit-Somaiya Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kirit Somaiya Politics: महापौर नसरीन बानो यांचा किरीट सोमय्यांना दणका; बांगलादेशी वादाची वात पुन्हा पेटवली!

Malegaon Mayor Nasreen Banu's challenge to Kirit Somaiya on Bangladeshi issue to be investigated-भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांना मालेगावच्या महापौरांनी दिले थेट आव्हान

Sampat Devgire

Malegaon Birth Certificate News: मालेगाव महापालिकेची पहिली महासभा बुधवारी झाली. त्यावेळी गेल्या वर्षभर मालेगावला राजकीय दौरे करणाऱ्या यांचा प्रश्न चर्चेत आला. यावेळी सोमय्या यांच्या वादाला नवी फोडणी देण्यात आली.  

भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मालेगाव हे शहर बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांचे आश्रयस्थान असल्याचा आरोप केला होता. येथून हजारो बनावट दाखले देण्यात आल्याचा त्यांचा आरोप होता. संदर्भात तहसीलदारांसह काही कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. 

भाजपचे किरीट सोमय्या यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही समर्थन होते. त्यामुळे विशेष पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपल्या अहवाल देत महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दोषारोपण केले होते. 

बांगलादेशी नागरिक आणि बनावट दाखले यावरून इस्लाम पक्षाचे माजी आमदार असिफ शेख यांनी सोमय्या यांना सातत्याने टार्गेट केले होते. त्यामुळे सोमय्या यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या पाठिंबावर मालेगाव प्रशासनाच्या चौकशीची मागणी केली होती. सोमय्या विरुद्ध मालेगावचे स्थानिक नेते यांच्यातील हा वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. 

महापालिकेच्या पहिल्याच महासभेत इस्लाम पक्षाच्या महापौर नसरीन बानो खालीद शेख यांनी हा विषय घेतला. या संदर्भात जन्म दाखले प्रकरणी जोरदार चर्चा झाली. महापौरांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली. 

महापौर नसरीन बानो यांनी माजी खासदार सोमय्या यांना थेट आव्हान दिले आहे. शहरातील तीन हजार ४६० दाखल्यांची चौकशी केली जाणार आहे. संदर्भात पोलिसात एक हजार ४४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमय्या सातत्याने शासनाच्या माध्यमातून याप्रकरणी दबाव निर्माण करीत होते. 

आता मालेगावच्या महापौर यांनी माजी खासदार सोमय यांना थेट आव्हान दिले आहे. मालेगाव शहराची बदनामी करणाऱ्या राजकीय नेत्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल. मालेगावच्या नागरिकांना वेठीस धरणाऱ्यांना योग्य धडा शिकवू, असा निर्धार महापौरांनी महासभेत व्यक्त केला. 

त्यामुळे जन्मदाखले तसेच बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांच्या वादाची वात मालेगावच्या महापौरांनी पुन्हा एकदा पेटवली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांना नव्याने आव्हान देण्याची तयारी मालेगावच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात हे राजकारण अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. 

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT