Tribal Politics: मंत्री अशोक उईके यांचा शब्द ठरला बुडबुडा, संतापलेल्या आदिवासींचा पुन्हा बिऱ्हाड मोर्चा?

Nashik BJP Tribal Development Minister Ashok Uike employees and family members' protest resumes-चार महिने रस्त्यावर बसलेल्या बिरहाड मोर्चाला आदिवासी मंत्र्यांची पुन्हा 'टोपी'
Dr-Ashok-Uike-Tribal-agitation
Dr-Ashok-Uike-Tribal-agitationSarkarnama
Published on
Updated on

Dr. Ashok Uike News: आदिवासी शिक्षण विभागातील भरतीचा वाद अद्याप सुरूच आहे. बाह्यस्त्रोत भरती बाबत चार महिने रस्त्यावर बिरहाड थाटलेल्या आंदोलकांना पुन्हा आंदोलनाची वेळ आली आहे. त्यामुळे आदिवासी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.  

बाह्यस्त्रोत भरती रद्द करण्यात यावी. आदिवासी आश्रम शाळांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत घ्यावे, साठी नाशिक मध्ये चार महिने आंदोलकांनी रस्त्यावर बिऱ्हाड फाटले होते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेवटपर्यंत भेट झाली नव्हती. 

या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आंदोलकांना आश्वासन दिले होते. त्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र भाजपचा हा पुढाकार हवेतच विरला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या होत्या तशाच राहिल्या. 

Dr-Ashok-Uike-Tribal-agitation
Rohit Pawar : अजितदादांच्या अपघातावरुन राजकारणाचा 'र', रोहित पवारांचा विखे पाटलांवर पलटवार

या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाच्या भरती विरोधात पाच महिने आंदोलन सुरू होते. आयुक्तालयासमोर रस्त्यावरच या कर्मचाऱ्यांनी आपले बिऱ्हाड फाटले होते. मात्र या आंदोलकांची शासनाला आणि अधिकाऱ्यांनाही दया आली नव्हती. 

Dr-Ashok-Uike-Tribal-agitation
Dhule Mayor Politics: भाजप महापौरांचा नवा पायंडा, लाल दिव्याची गाडी नाकारली, मानधन अन् वाहन भत्त्याबाबतही घेतला मोठा निर्णय!

याबाबत मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासन हवेतच विरले आहे. आंदोलन मागे घ्यावे यासाठी मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना तोंड भरून आश्वासन दिले. त्याची पूर्तता मात्र झाली नाही. त्यामुळे राजकीय डावपेच करत मंत्र्यांनी आंदोलकांना कात्रज चा घाट दाखवला अशी भावना आहे. 

यापूर्वी तब्बल दीडशे दिवस चाललेले आंदोलन आता पुन्हा सुरू होणार आहे. यासंदर्भात रोजंदारी कर्मचारी संघटनेचे नेते ललित चौधरी यांनी सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कुटुंबांसह रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. 

शासनाने या न्याय मागण्या तातडीने पूर्ण न केल्यास कर्मचारी पुन्हा रस्त्यावर उतरतील असा इशारा देण्यात आला आहे. बाह्य स्त्रोत भरती खाजगी कंत्राटदारांमार्फत जादा दराने केली जात आहे. त्यात सरकारला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. ही प्रशासन आणि मंत्र्यांचा बाह्य स्त्रोत भरतीसाठी आग्रह का? असा प्रश्न त्यांनी केला. 

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com