Shiv Sena leader Dada Bhuse and former MLA Asif Shaikh emerge as key power centres during tense negotiations for the Malegaon Municipal Corporation mayoral post. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon Mayor Politics: हिंदुत्वाचा झेंडा की महापौरपदाची खुर्ची? दादा भुसे यांच्यासमोर मोठं धर्मसंकट!

Dada Bhuse News : मालेगाव महापालिका निवडणुकीत माजी आमदार असिफ शेख यांना सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.

Sampat Devgire

Shivsena Eknath Shinde News : मालेगाव महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार आसिफ शेख यांचे जोरदार कमबॅक झाले आहे. त्यांच्या इस्लाम पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता महापौर पदाच्या हालचाली सुरू आहेत.

मालेगाव महापालिका निवडणुकीत माजी आमदार असिफ शेख यांना सर्वाधिक पस्तीस जागा मिळाल्या. त्यांनी खालील रशीद शेख यांना महापौर पदाचे उमेदवार घोषित केले आहे. मालेगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी बहुमताचा आकडा असिफ शेख यांच्याकडे नाही.

आसिफ शेख यांनी इस्लाम हा पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाने समाजवादी पक्षाशी युती केली होती. समाजवादी पक्षाला पाच जागा मिळाल्याने या आघाडीची सदस्य संख्या 40 झाली आहे. मात्र महापौर पदासाठी आणखी तीन नगरसेवकांची बेगमी करावी लागणार आहे. ही संख्या गाठण्यासाठी धडपड सुरू आहे.

मालेगाव महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला तीन जागा मिळाल्या आहेत. या पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून 58 उमेदवार मैदानात उतरवले होते. मात्र यातील बहुतांश पक्षांच्या पदरी अपयश पडले आहे.

अशा स्थितीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे दादा भुसे यांनी १८ जागा मिळवल्या. यापूर्वीही दादा भुसे यांनी माजी आमदार अशिफ शेख यांच्या वडिलांची महापालिका महापालिकेत हात मिळवणे केली होती. त्यामुळे भुसे आणि शेख यांचे राजकीय संबंध चांगले आहेत.

आसिफ शेख यांना काँग्रेस पाठिंबा देण्यास उत्सुक आहे. त्यांच्या तीन नगरसेवकांमुळे महापौर पदाची निवडणूक सोपी होणार आहे. मात्र माजी आमदार असिफ शेख यांनी वेगळेच गणित मांडले आहे. त्यामुळे त्यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे मदतीचा हात पुढे करण्याचा विचार केला आहे.

राज्याच्या राजकारणात सातत्याने हिंदुत्वाचे गुणगान करणाऱ्या आणि या प्रश्नावरून शिवसेना उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या दादा भुसे यांच्यापुढे या निमित्ताने मोठे धर्मसंकट उभे राहण्याची शक्यता आहे.

मालेगाव महापालिका निवडणुकीत महापौर पदासाठी दादा भुसे सत्तेत आहेत. शहराच्या विविध प्रश्नांसाठी सत्तेचा उपयोग व्हावा म्हणून माजी आमदार शेख हे दादा भुसे यांच्या संपर्कात आहेत. यापूर्वीही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सख्य केले होते. मात्र अजित पवार यांच्या पक्षाचा एकही नगरसेवक मालेगाव शहरात नाही. अशा स्थितीत महापौर पदाच्या नव्या राजकीय समीकरणांची जुळवा जुळवा उत्सुकतेचा विषय बनला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT