Congress leaders during a crucial meeting in Malegaon amid intense political developments ahead of the mayoral election, highlighting the Congress–BJP alliance controversy. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress BJP Alliance : भाजपसोबत युती करणं काँग्रेस शहराध्यक्षाच्या अंगलट! हर्षवर्धन सपकाळांनी थेट पक्षातून हकालपट्टीच केली

Malegaon Mayor Election Politics : मालेगाव महापौर पदाच्या निवडणुकीत एमआयएमला धक्का देण्यासाठी काँग्रेसने भाजपशी युती केली होती. पक्षाच्या धोरणाशी फारकत घेत झालेला हा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींना मानवला नाही. पक्षाच्या नेत्यांनी हालचाली करून ही युती करणाऱ्यांचा बंदोबस्त केला.

Sampat Devgire

Malegaon News, 03 Feb : राष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पक्षाशी थेट संघर्ष करणाऱ्या काँग्रेस पक्षाने मालेगाव शहरात उफराटी भूमिका घेतली. याची माहिती वरिष्ठांना मिळताच संतप्त काँग्रेस नेत्यांनी तातडीने हालचाल केल्यामुळे आगाऊ नेत्यांना चांगलीच चपराक बसली आहे.

मालेगाव महापौर पदाच्या निवडणुकीत एमआयएमला धक्का देण्यासाठी काँग्रेसने भाजपशी युती केली होती. पक्षाच्या धोरणाशी फारकत घेत झालेला हा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींना मानवला नाही. पक्षाच्या नेत्यांनी हालचाली करून ही युती करणाऱ्यांचा बंदोबस्त केला.

मालेगाव महापौर पदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे आणि एमआयएम यांनी नवे आव्हान निर्माण केले होते. नगरसेवकाची जमवाजमव करून 40 चा आकडा गाठला होता. यामध्ये माजी आमदार असिफ शेख यांना धक्का देण्याचा त्यांचा डाव होता.

मालेगाव महापालिकेत उपमहापौर आणि स्थायी समिती या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर काँग्रेस नेते एजाज बेग यांचा डोळा होता. सोशल मीडियावर तसे स्टेटस ठेवून त्यांनी आपले मनसुबे जाहीर केले होते. त्यासाठी त्यांनी चक्क भाजपच्या दोन सदस्यांना बरोबर घेत पाच सदस्यांचा गट नोंदवला होता.

काँग्रेस आणि भाजप यांची वैचारिक फारकत येथे बाजूला ठेवण्यात आली. ही माहिती मिळताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस नेत्यांना तंबी दिली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसात काँग्रेस भाजपची आघाडी मोडीत काढण्यात आली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी याची गंभीर दखल घेतली. तातडीने हालचाली करीत शहराध्यक्ष एजाज बेग यांची थेट हकालपट्टी करण्यात आली आहे. आता माजी आमदार आसिफ शेख यांच्या निधर्मी आघाडीला काँग्रेस पाठिंबा देणार आहे. त्यामुळे सत्तेत येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या एमआयएम चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांना मोठा धक्का बसला आहे.

मालेगाव महापौर पदाची निवडणूक सहा फेब्रुवारीला होत आहे. त्यासाठी माजी आमदार शेख यांनी सावधगिरी म्हणून आपले सर्व नगरसेवक सहलीला पाठवले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचाली जोरात आहेत. काँग्रेसने हालचाली करून एमआयएम आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे महापौर पदाचे स्वप्न उधळून लावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT