Amol Mitkari : 'अजित दादांची लाडकी बहीण...'; फडणवीस अन् शिंदे दोघेही जवळचे म्हणत अमोल मिटकरींनी राज्य सरकारकडे केली मोठी मागणी

Ajit Pawar Ladki Bahin Yojana : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज) या पुण्यातील प्रसिद्ध दुध संघाला "अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज" असे नाव देण्याचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे.
NCP MLA Amol Mitkari addresses the media while demanding that the Ladki Bahin Yojana be renamed in memory of Ajit Pawar to honor his legacy.
NCP MLA Amol Mitkari addresses the media while demanding that the Ladki Bahin Yojana be renamed in memory of Ajit Pawar to honor his legacy.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 03 Feb : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारकडे दिवंगत नेते अजित पवार यांच्या संदर्भात एक मोठी मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकारची लोकप्रिय योजना ठरलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

अजितदादांच्या दूरदृष्टीतून आलेल्या या योजनेला 'अजितदादांची लाडकी बहीण योजना' असं नाव देऊन त्यांच्या स्मृती सरकारने जपाव्यात असं, आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या आठवणी जपण्यासाठी विविध ठिकाणी त्यांच्या नावाने स्मारकं उभारली जाणार आहेत.

शिवाय नुकतंच पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज) या पुण्यातील प्रसिद्ध दुध संघाला "अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज" असे नाव देण्याचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे.

NCP MLA Amol Mitkari addresses the media while demanding that the Ladki Bahin Yojana be renamed in memory of Ajit Pawar to honor his legacy.
Ajit Pawar : 'जितेंद्र, माझ्यावर विश्वास ठेव; सगळं काही व्यवस्थित करून देईन'; अजितदादांनी पवारांच्या पट्टशिष्याला दिला होता शब्द...

त्यानंतर आता आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अजित पवारांच्या आठवणी जपण्यासाठी राज्यातील बहुचर्चित लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव देण्याची मागणी केली आहे. मिटकरी म्हणाले, 'अजितदादा कुटुंब प्रमुख म्हणून चांगले होते. ते जनतेत राहणारे लोकनेते आणि सर्वांना आवडणारे नेते होते.

NCP MLA Amol Mitkari addresses the media while demanding that the Ladki Bahin Yojana be renamed in memory of Ajit Pawar to honor his legacy.
Satyajit Bade : IAS सत्यजित बडे यांची पुण्यात दिव्यांग आयुक्तपदी नियुक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही अजितदादांच्या अगदी जवळचे होते. अजितदादा गेल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे दोघेही नेते भावाप्रमाणे उभे राहिलेत. सात दिवस झाले तरीही अजून महाराष्ट्र या धक्यातून बाहेर निघालेला नाही.

अशा व्यक्तींच्या स्मृती जपण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला, 'अजित दादांची लाडकी बहीण योजना' असं नाव द्यावं. शिवाय यासाठी फडणवीसांना प्रत्यक्षात भेटून मागणी करणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे आता मिटकरींच्या मागणीला सरकार कसा प्रतिसाद देतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com