Samajwadi Party leaders submit memorandum to police officials in Malegaon demanding action against Kirit Somaiya over controversial remarks. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांसाठी मालेगावचे दार आता बंद? शहराला दहशतवादीची उपमा देताच समाजवादी पक्ष पोलिसांकडे

Samajwadi Party Demand : नगरसेवक मुश्ताक डिग्निटी यांचे किरीट सोमय्या सोमय्या यांना आव्हान, पोलिसांनी 'एसआयटी' चा अहवाल जाहीर करावा! समाजवादी पक्ष आक्रमक

Sampat Devgire

Malegaon Politics : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा नुकताच मालेगाव दौरा पार पडला. यात त्यांनी गंभीर आरोप केले होते. मालेगाव शहर हे दहशतवाद्यांचे केंद्र आहे असे विधान त्यांनी केले होते. या विधानाच्या तीव्र प्रतिक्रिया शहरातील सर्व राजकीय पक्षांत उमटल्या. यासंदर्भात काही सामाजिक संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. सोमय्यांची पाठ फिरताच, समाजवादी पक्षाने मोठे पाऊल उचलले आहे.

किरीट सोमय्या यांची पाठ फिरताच समाजवादी पक्षाचे नेते आणि मालेगाव महापालिकेचे गटनेते मुश्ताक डिग्निटी यांनी थेट अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. सोमय्या यांच्या यानंतरच्या मालेगाव दौऱ्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. सोमय्या यांनी एसआयटी अहवालाचा संदर्भ देत बनावट दाखले देश विरोधी शक्तींना दिल्याचा उल्लेख केला होता. याबाबत नगरसेवक डिग्निटी यांनी पोलिसांना लिखित पत्र दिले आहे.

पोलिसांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या, मालेगाव शहराची बदनामी करणाऱ्या सोमय्या यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 2025 मध्ये शासनाने मालेगावमधील जन्मदाखल्यांबाबत 'एसआयटी'ची घोषणा केली होती. या समितीचा अहवाल ६ महिन्यात अपेक्षित होता. मात्र एक वर्ष उलटूनही तो जाहीर झालेला नाही. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याच अहवालाचा संदर्भ देत मालेगाव शहराविषयी गंभीर विधाने केली आहेत.

या विधानांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील गृह खाते निष्क्रिय आणि बेजबाबदार असल्याचा संदेश सोमय्या यांच्याकडून वारंवार दिला जातो. त्यामुळे एसआयटीचा अहवाल तातडीने जाहीर करावा. त्याची प्रत समाजवादी पक्षाला देण्यात यावी अशी मागणी नगरसेवक मुष्टक डिग्निटी यांनी केली आहे. नगरसेवक डिग्निटी यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यांच्यासमवेत विविध नगरसेवकांनी कार्यकर्ते होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT