Dada Bhuse & Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut Politics: भुसे विरुद्ध राऊत खटल्यात समझोता, मात्र जाता जाता राऊत यांनी भाजपला गुंडाळले!

Malegaon Shiv Sena UBT Sanjay Raut Minister Dada Bhuse Court Case BJP-शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विरोधातील खटल्यात भाजला कोंडीत पकडले.

Sampat Devgire

Sanjay Raut News: गिरणा साखर कारखाना विक्री प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात राजकीय आरोप झाले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या आरोपांनी दोन्ही मालेगावच्या न्यायालयात शिवसेना आमने-सामने होत्या. या प्रकरणावर आता पडदा पडला आहे.

गिरणा साखर कारखाना शेअर प्रकरण त शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला होता. मंत्री भुसे यांचे पारंपारिक राजकीय विरोधक अद्वय हिरे यांची त्यात भूमिका होती. त्यामुळे शिक्षण मंत्री भुसे यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार अद्वय हिरे यांनी हे आरोप केले होते. त्याची पुनरावृत्ती खासदार संजय राऊत यांनी केली. त्यामुळे भुसे यांनी राऊत यांच्या विरोधात मालेगाव येथील न्यायालयात खटला दाखल केला होता.

मंत्री भुसे यांनी दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीला खासदार राऊत शनिवारी उपस्थित होते. समझोता होऊन यावेळी मंत्री भुसे यांनी खटला मागे घेतला. खासदार राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने या वादावर पडदा पडला. 

मात्र स्थानिक राजकारणाचा भाग म्हणून मधल्या काळात अद्वत हिरे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. श्री हिरे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केला. त्यामुळे मालेगावचे स्थानिक राजकीय संदर्भ बदलले होते.

खासदार राऊत यांनी हिरे यांच्या सांगण्यावरून आरोप केल्याचे सांगितले. संदर्भात शिक्षण मंत्री भुसे यांच्या विरोधात आणखीन एक खटला प्रलंबित आहे. याबाबत आपली जबाबदारी झटकत भाजपने हा खटला लढवावा, असा राजकीय टोमणा राऊत यांनी लगावला. 

यानिमित्ताने शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षातील दोन्ही नेत्यांचे पूर्वाश्रमीचे संबंध कामी आले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी एक पाऊल मागे येत या खटल्यातून परस्परांची सुटका करून घेतली आहे. शिवसेना नेत्यांची सुटका झाली असली तरीही भाजपवासी झालेले हिरे यांनी न्यायालयात खटला सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एका अर्थाने संजय राऊत यांनी जाता जाता भाजपला गुंडाळले, प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT