Sangamner news : “पाणी द्या” म्हणणं पडलं महागात! युवकाला लगावली कानाखाली! बाजार समिती संचालकाचा कारनामा, प्रकरण थेट पोलिसांत

Ahilyanagar: Youth Assaulted in Gram Sabha Over Water Question : ग्रामसभेत प्रश्न विचारला म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाने युवकाला लाथाबुक्कांनी मारहाण केल्याचा प्रकार संगमनेरमध्ये घडला आहे.
Sangamner taluka news
Sangamner taluka newsSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar news : 'पिण्याचे पाणी नियमित येत नाही', अशी तक्रार युवकाने भर ग्रामसभेत केली. याचा राग आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालकाने थेट त्याचा कानाखाली मारली.

यानंतर या कृषी संचालकाने त्या युवकाला लाथाबुक्कांखाली तुटवला. या प्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. संगमनेर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत, युवकाच्या तक्रारीवरून संचालकांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.

संगमनेर (Sangamner) धांदरफळ खुर्द गावात शिवजयंतीच्या दिवशी ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. ग्रामसभेदरम्यान नियमित पाणी येत नसल्याचा प्रश्न पियुष ठोंबरे या युवकाने मांडला. या प्रश्नावर “तू काय प्रश्न मांडतोस, बघतो तुझ्याकडे” असे धमकावत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक सतीश विश्वनाथ खताळ याने पियुष याच्या अंगावर धावत जात कानाखाली मारली. यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

शिवजयंतीचे औचित्य साधून गावात ग्रामसभा (Gram Panchayat) आयोजित करण्यात आली होती. या वेळी पियुष ठोंबरे या युवकाने आपल्या घरात नियमितपणे पाणी येत नसल्याची तक्रार ग्रामसभेत केली. मात्र या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देण्याऐवजी काही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत धमकी देत मारहाण केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

Sangamner taluka news
Shirdi crime update : शिर्डीत ‘वेशांतर गँग’चा खेळ खल्लास! महिलांच्या टोळीचा धक्कादायक कारनामा उघड

लोकशाहीवर थप्पड..?

ही घटना ग्रामसभेत घडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामसभा ही नागरिकांच्या प्रश्न सोडवण्याचा मंच आहे. असे असताना प्रश्न मांडणाऱ्या युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण होणे म्हणजे, लोकशाही मूल्यांची पायमल्ली आहे. या प्रकाराचा गावकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

Sangamner taluka news
Religious conversion pressure case : शिर्डीत खळबळ! 15 वर्षीय मुलीवर धर्मांतरासाठी दबाव; ‘द केरळ स्टोरी’सारखा प्रकार, पोलिस कारवाई सुरू

समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे. पियुष ठोंबरे हा हल्लेखोर संचालक सतीश खताळ याच्यापासून दुसऱ्या बाजूला उभा आहे. पियुष याने प्रश्न विचारल्यानंतर खताळ त्याच्या अंगावर धावून जात, सुरवातीला कानाखाली मारताना दिसतो आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगानं व्हायरल होतं आहे.

घटनेवर कडक कारवाईची मागणी

या घटनेची गंभीर दखल घेत संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली आहे. या घटनेनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण झाले असून, संबंधितांवर कडक कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. यात नक्कीच राजकीय रंग भरला जाणार असल्याने, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com