Malegaon Vote Theft- Narendra Sonawane allegations  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon Vote Theft : मालेगावात लोकशाहीचा खून ! 'मत चोरी'वरुन पुरावे दाखवत माजी उपमहापौरांनी केले गंभीर आरोप

Narendra Sonawane allegations : माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांनी मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप केला आहे. पत्रकारपरिषदेत त्यांनी थेट पुरावे सादर करत हे आरोप केले.

Ganesh Sonawane

Malegaon News : मालेगावच्या मध्य व बाह्य विधानसभा मतदारसंघांत मतचोरीचा मुद्दा चांगलाच पेट घेत आहे. याबाबत माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन ‘मत चोरी’ संदर्भात गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेत त्यांनी स्लाइड शोद्वारे थेट पुरावे दाखवले.

मालेगावा महापालिका हद्दीतील पूर्वीच्या आठ व सध्याच्या ९ क्रमांकाच्या एकाच प्रभागाच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असून जवळपास ३ हजार नावे दुबार आहेत. ही नावे संशयास्पद असून वेगवेगळ्या छायाचित्रांचा वापर करुन आणि पत्त्याचा उल्लेख टाळून मतदार यादीत ही नावे सामाविष्ट केली गेल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे. यात काही मतदारांच्या घरांचा पत्ता नाही. प्रशासकीय आशीर्वादाशिवाय हे होणार नाही असा आरोप त्यांनी केला आहे.

मालेगाव महापालिका निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे त्यांनी म्हटले. ९ क्रमांकाच्या प्रभागातील मतदार यादीबद्दल संशय आल्याने आपण यासंदर्भात अभ्यास केला. त्यानंतर काही गंभीर व धक्कादायक बाबी आपल्या निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.

या यादीत अनेकांची नावे दुबार तर काहींची नावे चक्क चार वेळा असल्याचे आढळून आले. एकाच व्यक्तीचे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे छायाचित्र वापरण्यात आले आहे. शिवाय मतदाराच्या पत्त्याच्या रकान्यात शुन्य किंवा नुसती रेष असे नमूद आहे. शेजारील बागलाण मतदार संघ, धुळे व नाशिक शहरात असणाऱ्या मतदारांची अनेक नावे या प्रभागात घुसडवण्यात आली आहेत असा दावा सोनवणे यांनी केला.

या सगळ्या प्रकारामुळे बोगस मतदान होण्याचा धोका संभवतो. मतदार यादीतील संशयास्पद मतदारांमुळे लोकशाहीचा खून होत आहे. लोकशाहीची ही थट्टा आहे. यासंदर्भात तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार नोंदवल्यावरही ही बोगस नावे वगळण्याची कारवाई करण्यात आलेली नाही.

बीएलओंनी मतदार यादीत घोळ केल्याचा आरोप करत या विरोधात तहसीलदार, संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यांसदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ‘एसआयटी’ गठीत करून चौकशी करण्याची मागणी करणार असून उच्च न्यायालयात देखील लढाई लढू असा इशारा सोनवणे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT