Mamta Kulkarni News: सिंहस्थ कुंभमेळा दोन वर्षांनी होणार आहे. मात्र प्रत्येक कुंभमेळ्यात होणारा असली, नकली साधूंचा वाद यंदाही होणार असे चित्र आहे. यामध्ये किन्नर आखाड्याने केलेली घोषणा वादाचे कारण ठरू शकते.
अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने प्रयागराज येथील कुंभमेळ्यात साध्वी म्हणून महामंडलेश्वर ही पदवी धारण केली होती. किन्नर आखाड्याने त्यांनाही पदवी दिली होती. त्यामुळे प्रयागराज च्या कुंभमेळ्यात तो मोठा वादाचा विषय ठरला होता. या वादाचे पडसाद नाशिकच्या कुंभमेळ्यातही उमटण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नाशिकच्या कुंभमेळ्याचा आढावा घेतला. त्यांची पाठ फिरताच किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी एक घोषणा केली.
महामंडलेश्वर यमाई ममतानंद गिरी अर्थात अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला आखाड्याने निष्काशीत केल्याची बातमी होती. या संदर्भात या आखाड्याचे प्रमुख आचार्य महामंडलेश्वर डॉ त्रिपाठी यांनी त्यांना निष्काशीत केलेले नाही. ममता कुलकर्णी नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यात भाग घेतील. या विषयावर वाद घालणाऱ्यांना आखाड्याने बाजूला केले आहे, असे स्पष्ट केले.
किन्नर आखाडा त्रंबकेश्वर येथे कुंभमेळ्यात स्नान करील, असा दावा डॉ त्रिपाठी यांनी केला आहे. वस्तूत: अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या फक्त १३ आखाड्यांनाच मान्यता आहे. त्यामध्ये किन्नर आखाड्याचा समावेश नाही. प्रयागराज कुंभमेळ्यातही किन्नर आखाड्याला मान्यता नव्हती, असा दावा केला जातो.
या स्थितीत किन्नर आखाडा त्र्यंबकेश्वरच्या दहा आखाड्यांमध्ये स्नानासाठी कोणती वेळ घेणार? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या यादीत देखील या आखाड्याचा समावेश नाही. त्यामुळे किन्नर आखाड्याने परस्पर घोषणा करून नाशिकच्या कुंभमेळ्यात एका नव्या वादाची ठिणगी पाडली आहे. नाशिकचे सिंहस्थ कुंभमेळा या वादामुळे चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.