BJP vs Vikhe Patil supporters Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP vs Vikhe Patil supporters : 'भाजप मंडल अध्यक्ष व्हायचंय, DNA काँग्रेसचाच असला पाहिजे'; श्रीरामपूकरांच्या बॅनरबाजीवरून तणाव

Radhakrishna Vikhe Supporters Clash with BJP over Mandal Post in Ahilyanagar : अहिल्यानगर श्रीरामपूर इथं मंडल अध्यक्षाच्या नियुक्तीवरून भाजपमधील गटबाजी उफाळली असून, जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar political dispute : अहिल्यानगर जिल्ह्यात मंडल अध्यक्ष नियुक्तीवरून भाजपमध्ये गटबाजी उफाळली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखेंविरुद्ध जुना भाजप, असा हा वाद उफळला आहे. श्रीरामपूरमध्ये यावरून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली असून चर्चेचा विषय बनली आहे.

'एक श्रीरामपूरकर', म्हणून अशी ही बॅनरबाजी करताना, भाजपचा पदाधिकारी होण्यासाठी DNA काँग्रेसचाच असला पाहिजे, अशी पात्रता आवश्यक आहे, असे खोचक टोले मारले आहेत. श्रीरामपूरच्या चौका-चौकात हे बॅनर लावण्यात आले असून, नव्याने नियुक्ती झालेल्या मंडल अध्यक्षाच्या शुभेच्छा बॅनरजवळच हे खोचक टोलेबाजीचे बॅनर लावले गेल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

एक श्रीरामपूरकर म्हणून, करण्यात आलेल्या बॅनरबाजीवर भाजप मंडल अध्यक्ष होण्यासाठी काय अटी-शर्ती आहेत, यावर खोचकपद्धतीने टीका केली आहे. फोर्च्यूनर गाडी आणि पैसे असेल, तरच भाजप अध्यक्ष होता येईल. दूध भेसळ घोटाळ्याचा गुन्हेगार पाहिजे. बूथ प्रमुख आणि भाजप सदस्य न केलेला असला तरी चालेल. DNA काँग्रेसचाच (Congress) असला पाहिजे, अशा खोचक अटी लक्ष वेधून घेतात.

याशिवाय अध्यक्ष निवडीसाठी मुलाखत न दिलेला असला तरी चालेल. पैसे असेल, तर 45 वयाची अट शिथिल केली जाईल. तो भाजप (BJP) सदस्य नसला तरी चालेल, असे म्हणून 'झन झन की सुनो झंकार ये पैसा बोलता है', असे शेवटी बॅनरवर म्हटले आहे.

श्रीरामपूर मंडल अध्यक्षांना नियुक्तीच्या शुभेच्छांचे जिथे फलक लागले आहेत, त्याच शेजारी खोचक फटकारे ओढणारे हे बॅनर लागले आहेत. श्रीरामपूरमधील या बॅनरबाजीमागे जुनी भाजपविरुद्ध पालकमंत्री राधाकृष्ण विखे समर्थक, अशी गटबाजी आहे. त्यामुळे या वादावर भाजप प्रदेश काय तोडगा काढणार याकडे आता लक्ष लागलं आहे.

दरम्यान, शेवगाव आणि वाळकी चिचोंडी मंडल अध्यक्षांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. शेवगावमध्ये अमोल सागडे यांची मंडल अध्यक्षपदावर नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. सागडे हे विखे समर्थक आहेत. परंतु या नियुक्तीविरुद्ध तक्रार झाली आणि पक्षाचे कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्थगिती दिली. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील वाळकी चिचोंडी मंडला अध्यक्ष नियुक्तीमागे देखील असाच वाद असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT