MP Suresh Mhatre: बाळ्या मामांची पोलिस ठाण्यात 'एन्ट्री'; झाप झाप झापले; भिंवडी मध्ये काय घडलं?

MP Suresh Mhatre on Bhiwandi Police Over False FIRs:भिवंडी तालुका पोलिसांची हि वागणूक दुर्दैवी आहे. यामुळे तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी वेळीच या बाबीची गंभीर दखल घेतली नाही तर पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन करू, असा इशारा बाळ्या मामा यांनी दिला आहे.
MP Suresh Mhatre
MP Suresh Mhatre Sarkarnama
Published on
Updated on

Bhiwandi Police new:अनेक वेळा पोलिस खऱ्या गुन्ह्यांऐवजी खोटे गुन्हे दाखल करतात. खऱ्या गुन्हे दाखल करण्यात पोलिस टाळाटाळ करण्यचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) उर्फ बाळ्या मामा (Balya Mama) यांनी केला आहे. बाळ्या मामा यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना चांगलेच धारेवर धरून खडसावले.

राजकीय दबावापोटी पोलिस खोटे गुन्हे त्वरित दाखल करतात. मात्र खऱ्या गुन्ह्यांमध्ये नागरिकांना वेठीस धरून त्यांच्याकडून पुराव्यांची मागणी करत फिर्यादींना ताटकळत ठेवतात. भिवंडी तालुका पोलिसांची हि वागणूक दुर्दैवी आहे. यामुळे तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी वेळीच या बाबीची गंभीर दखल घेतली नाही तर आपण तालुका पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन करू, असा इशारा यावेळी खासदार बाळ्या मामा यांनी दिला आहे.

MP Suresh Mhatre
BJP Youth Leadership: भाजपचा मोठा निर्णय; संघटना बांधणीची जबाबदारी युवकांच्या खाद्यांवर; 45 पार नेत्यांचा पत्ता कट

खार्डी गावातील एका तरुणाला मारहाण झाल्यानंतर हा तरुण मारेकऱ्यांच्या भीतीने तक्रार दाखल करण्यासाठी तालुका पोलिस ठाण्यात शनिवारी गेला होता. मात्र या मारहाण झालेल्या तरुणाला तालुका पोलिसांनी तीन तासाहून अधिक काळ गुन्हा नोंद न करता ताटकळत ठेवले होते. या संपूर्ण प्रकरणाची माहिती खासदार बाळ्या मामा यांना मिळताच त्यांनी पोलिस ठाणे गाठले. याबाबत पोलिसांनी जाब विचारला.

MP Suresh Mhatre
Raj Thackeray: वीस वर्षांपूर्वी शिवसेना सोडल्यानंतर काय म्हणाले होते राज ठाकरे...

भिवंडी पोलिसांनी मागील अनेक खऱ्या प्रकरणांमध्ये फिर्यादीची बाजू ऐकून न घेता गुन्हा दाखल करण्यास देखील विलंब करीत आहेत. काही दाखल गुन्ह्यांमध्ये तालुका पोलिस फिर्यादी ऐवजी आरोपींची बाजू उचलून धरत असल्याने अनेक प्रकरणांमध्ये फिर्यादींनी आरोपींना घाबरून स्वतःच्या व कुटुंबियांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपले दाखल गुन्हे मागे घेतल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. वेळ आल्यास ही प्रकरणे पुराव्यांनिशी आपण समोर आणू शकतो, असा दावा देखील खासदार बाळ्या मामा यांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com