Mangesh Chavan MLA controversy latest update: निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मात्र, महायुतीमधील मित्र पक्षांमध्ये कुरबुरी सुरूच आहेत. पारोळा मतदारसंघात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतीमधील नेत्यांचा वाद टोकाला गेला आहे. या वादात थेट एकमेकांचे राजकारण संपवण्याची भाषा करण्यात येत आहे.
भाजपने शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्या सर्व विरोधकांची मोट बांधली आहे. बुधवारी या नेत्यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. या मेळाव्यात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी 'मी पाचोरा मतदारसंघात लक्ष घातले आहे.', असे सूचक इशारा पाटील यांना दिला.
मंगेश चव्हाण यांनी एकेरीवर येत किशोर पाटील यांना थेट आव्हान दिले. ते म्हणाले, आमदार पाटील यांनी चाळीसगाव नगरपालिकेत एक नगरसेवक निवडून आणून दाखवावा. तसे केल्यास मी पाचोर्यात येऊन त्यांचा सत्कार करीन.
या मेळाव्याला आमदार पाटील यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविलेल्या वैशाली सूर्यवंशी, अमोल शिंदे यांसह खासदार स्मिता वाघ, संजय वाघ, माजी आमदार दिलीप वाघ प्रताप पाटील, अमोल पाटील हे सर्व विरोधक झाडून हजर होते.
या सर्व विरोधकांनी बाह्या सरसावून आमदार पाटील यांना आव्हान दिले. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीला लोकसभा आणि विधानसभेपेक्षाही अधिक राजकीय संघर्षाची चाहूल लागली.
पुढे बोलताना मंगेश चव्हाण म्हणाले, आमदारांचा पगार काय? ते बोलतात काय? आता तर ते थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करू लागले आहेत. तलाठी आणि तहसीलदारांना दम देऊ लागले आहेत.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात भाजप मजबूतपणे उभा आहे. पालिका निवडणुकीत आम्हाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जे डोक्यात घेतात ते पूर्ण करतात, असा सूचक इशारा त्यांनी दिला.
जळगाव जिल्ह्यात भाजप बहुतांशी सत्ता केंद्रे ताब्यात ठेवून आहे. त्यामुळे भाजपच्या एककल्ली आणि एकतर्फी राजकारणावर अनेकांची नाराजी आहे. या नाराजीला थेट आव्हान देण्याचे काम शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी केले आहे.
किशोर पाटील यांच्या या आव्हान भाजपने मोडून काढण्यासाठी रणनीती देखील आखत पाटील यांच्या सर्व विरोधकांना एकत्र केले आहे. त्यामुळे जळगावच्या राजकारणात भाजप विरुद्ध शिवसेना टोकाचा संघर्ष सुरू आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.