Nagpur Politics: बंडखोरांना पुरस्कार! काँग्रेसवर कसा भरवसा करायचा? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा थेट आरोप

Nagpur Politics: नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूक जाहीर होताच काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खटके उडायला सुरुवात झाली आहे.
Sharad pawar NCP, Congress
NCP leader Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Politics: नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूक जाहीर होताच काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खटके उडायला सुरुवात झाली आहे. मागील जिल्हा परिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससोबत दगाफटका केला. त्याची पुनरावृत्ती होणार असेल तर अशी आघाडी आम्हाला नको असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांनी स्पष्ट केले.

Sharad pawar NCP, Congress
Kumbhmela Politics: मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिला, मात्र संकटमोचक गिरीश महाजन प्रकट होईनात, शेतकऱ्यांची उडाली झोप!

विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी होती. काटोल आणि हिंगणा आणि पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आला होता. असे असताना काटोलमधून काँग्रेसचे याज्ञवल्क्य जिचकार यांनी बंडखोरी केली. त्यांना रोखण्याचे कुठलेही प्रयत्न करण्यात आले नाही. रामटेक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिले असताना काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली. निवडणूक आटोपल्यानंतर लगेच दोघांनाही पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. एवढेच नव्हे तर त्यांची मोठ्या पदावर नियुक्ती केली.

Sharad pawar NCP, Congress
Bjp Politcs: अजित पवारांना रोखण्यासाठी भाजपने उतरवले पाच मातब्बर मैदानात! सोपवल्या 'या' महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

यावरून दोघेही काँग्रेस पुरस्कृत बंडखोर उमेदवार होते हे स्पष्ट होते. पूर्व नागपूरमध्ये काँग्रेसने कामच केले नाही तर हिंगण्यामध्ये आमच्या उमेदवारावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, याकडेही कुंटे पाटील यांनी लक्ष वेधले. यापूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आघाडी असतानाही १० पैकी पाच जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे आमचा काँग्रेसवर भरवसा नाही. त्यापेक्षा इतर समविचारी पक्षांसोबत आमचा आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेकांसोबत बोलणीही झाली आहे. आमचे प्राधान्य महाविकास आघाडीला आहे. सेक्युलर मतांचे विभाजन होऊ नये आणि भाजपचे उमेदवार निवडून येऊ नये असे आमचे मत आहे.

Sharad pawar NCP, Congress
Top 10 News: नागपूर महापालिकेसाठी ठाकरेंच्या सेनेनं टाकला डाव ते सुरेश धस यांनी रान उठविलेल्या कृषि घोटाळ्याचा होणार पर्दाफाश

मात्र, काँग्रेसने दगाफटका करणार नाही याची हमी द्यावी असे आवाहन प्रवीण कुंटे पाटील यांनी केले. विशेष म्हणजे निवडणूक जाहीर होताच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुकांकडून अर्ज मागवणे सुरू केले आहे. यापूर्वीसुद्धा कुंटे पाटील यांनी निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसतर्फे आघाडीबाबत कोणीच चर्चा करीत नसल्याचे सांगितले होते. काँग्रेसने सन्मानाने जागा दिल्यास आणि बंडखोरांना उभे करणार नाही याची ग्वाही दिली तरच महाविकास आघाडी नागपूर जिल्ह्यात कायम राहील असेही कुंटे पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com