Manngesh Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mangesh Chavan Politics: गृहमंत्री अमित शहा यांच्या आवाहनाला भाजपच्या 'या' आमदाराचा अनोखा प्रतिसाद!

Mangesh Chavan;Responding to Amit Shah's appeal, MLA Mangesh Chavan took students on a tour of Raigad -आमदार मंगेश चव्हाण यांनी मतदारसंघातील एक हजार विद्यार्थ्यांची रायगड वारी आयोजित केली

Sampat Devgire

Mangesh Chavan News: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली होती. यावेळी त्यांनी रायगडचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावा असा उपक्रम घेण्याचे आवाहन केले होते. त्याला भाजपच्या आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रतिसाद दिला.

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी हा अनोखा उपक्रम भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण राबवित आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आवाहनाला हा अनोखा प्रतिसाद आहे. यानिमित्ताने मतदार संघात कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.

सोमवारी (या.९) चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या वारीला सुरुवात होईल. मध्ये मतदारसंघातील एक हजार विद्यार्थी सहभागी होतील. "तरुणाईचा ध्यास करारी... आम्ही रायगडचे वारकरी" असे या मोहिमेला नाव देण्यात आले आहे. भाजपचे आमदार चव्हाण यांची ही मोहीम विशेष चर्चेचा विषय बनली आहे.

अकरावी आणि बारावी उत्तीर्ण दोन हजार विद्यार्थ्यांसाठी नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित परीक्षा घेण्यात आली. त्याला रायगड मोहीम एंट्रन्स टेस्ट असे नाव देण्यात आले होते. त्यातून एक हजार विद्यार्थ्यांची रायगडच्या वारीसाठी निवड करण्यात आली.

राज्य परिवहन महामंडळाच्या २५ आणि ५० खाजगी बसेस या विद्यार्थ्यांना घेऊन जाणार आहेत. यासाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करण्यात आले आहे. जेवण आणि नाश्त्यासाठी चाळीसगावचे स्वयंपाकी सहलीत उपस्थित असतील. विविध शिक्षक या विद्यार्थ्यांना रायगडावर गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याची आणि रायगड या राजधानीची माहिती देऊन प्रबोधन करतील.

आमदार चव्हाण हे आपल्या आक्रमक राजकारणासाठी परिचित आहेत. विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि जास्तीत जास्त वैयक्तिक लाभार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. निमित्ताने राज्यातील सत्तेचा पुरेपूर उपयोग त्यांनी केला आहे. आता रायगड येथील वारीमुळे त्यांची चर्चा होत आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT