Manikrao Kokate News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. नुकताच त्यांचा सिन्नर मतदारसंघात सत्कार झाला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून असेच परखड शब्दात सुनावले.
शहा (सिन्नर) येथे समर्थकांचा मेळावा झाला. यावेळी मंत्रिमंडळात समावेश झाल्याने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मतदारसंघातील समर्थक आणि कार्यकर्त्यांनी विविध अपेक्षा व्यक्त केल्या.
यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अतिशय परखडपणे पुढे पुढे करणाऱ्या आणि दुहेरी निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांना सुनावले. ते म्हणाले, "कोण खरे बोलतो. कोण लबाड आहे. कोण प्रामाणिक आहे. हे मला चांगले कळते. कारण गेली २५-३० वर्षे मी राजकारणात आहे"
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे कृषिमंत्री कोकाटे पुढे म्हणाले, राजकारणात काम करताना अनेकदा दुटप्पी वागणारे लोक भेटतात. ते आपल्याला जाणवत असते. मात्र जेव्हा असे लोक स्तुती करतात. थेट घरापर्यंत पोहोचतात. तेव्हा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे लागते, त्याला पर्याय नसतो.
कृषिमंत्री कोकाटे यांच्या या बेधडक विधानाला उपस्थित आणि ही तेवढीच मनापासून दात दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी कोकाटे यांच्या या नेहमीच्या शैलीला मनापासून पसंती देत प्रत्येक वाक्याला टाळ्यांचा कडकडाट करत होते.
प्रामाणिक नागरिक आणि कार्यकर्ते कधीही मला भेटत नाहीत. अनेकदा ते फोन देखील करत नाहीत. माझ्याजवळ ही येत नाहीत. किरकोळ काही अपवाद वगळता सगळ्यांचे असेच असते. मी देखील त्यांना कधीच अंतर देत नाही.
खरा त्रास दोन टक्के लोकांचा असतो. त्यांचा प्रत्येक कामात व्यक्तिगत दृष्टिकोन असतो. कोण आपला, कोण जवळचा असे राजकारण ते करतात. गावात सोयीचे आणि गैरसोयीचे, कोणाच्या फायद्याचे आणि कोणाच्या नुकसानीचे हे ते बरोबर ठरवतात. तसे घडवूनही आणतात. हे दोन टक्के लोक खूपच त्रासदायक असतात. असा माझा आजवरचा अनुभव आहे. मात्र त्यांना दुखावताही येत नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे लागते, असे ते म्हणाले.
तालुक्यातील प्रामाणिक नागरिक आणि मतदार मात्र नेहमीच माझ्याबरोबर राहिले आहेत. निवडणूक आली की ते बरोबर आणि प्रामाणिकपणे कामाला लागतात. मला मतदान करतात. अशा प्रामाणिक लोकांना मी कधीही अंतर देणार नाही. या प्रामाणिक कार्यकर्त्यांची मला जाणीव आहे. त्यांना कधीही विसरणार नाही. त्यांचे काम केल्याशिवाय राहणार नाही, असेही कोकाटे यांनी स्पष्ट केले.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.