Manikrao Kokate, Anil Patil, Dhananjay Munde, Dilip Bankar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate : कोकाटेंच्या रिक्त मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांची फील्डिंग, नुसती पळापळ सुरु..

Manikrao Kokate Minister Post : माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा आता राज्यपालांनी देखील मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची धडपड सुरु आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : राज्याचे क्रिडामंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारला. त्यानंतर राज्यपालांकडूनही त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. सध्या कोकाटे यांची सगळी खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे कोकाटेंच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदाच्या जागेवर राष्ट्रवादीच्या इच्छुक आमदारांकडून फील्डिंग लावली जात असून त्यासाठी आमदारांची पळापळ सुरु झाली आहे.

सुरुवातीला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी लागलीच दिल्ली गाठली होती. भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट मुंडे यांनी घेतली. शाह यांच्यासोबत त्यांची तासभर चर्चा झाली. मंत्रिमंडळात पुन्हा कमबॅक करण्यासाठी मुंडे यांचे जोरात प्रयत्न सुरु आहेत. कोकाटे यांच्याजागी आपल्याला स्थान मिळेल अशी आशा धनंजय मुंडे यांना वाटू लागली आहे.

याचदरम्यान कोकाटे यांचे मंत्रिपद अन्य जिल्ह्यात न जाऊ देता ते नाशिक जिल्ह्यातच ठेवण्याच्याही हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर हे सक्रीय झाल्याचे समजते. कोकाटे यांच्या रिक्तजागेवर बनकर फिल्डींग लावण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीकडून दिलीप बनकर हे तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. शिवाय ते अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे ते मंत्रिपदावर दावा सांगू शकतात.

तिकडे जळगाव जिल्हयातील अंमळनेरचे आमदार अनिल पाटील यांचेही नाव पुढे आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आलं होतं. त्यावेळी ते मुदत व पुनर्वसन तथा व्यवस्थापन मंत्री होते. परंतु त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळात अनिल पाटील यांना डावलण्यात आले. त्यामुळे पाटील काहीसे नाराज होते. त्यामुळे आता कोकाटे यांच्या रिक्त जागी अनिल पाटील यांची देखील धडपड सुरु आहे. उत्तर महाराष्ट्रातीलच शिवाय मराठा चेहरा या तत्वावर अनिल भाईदास पाटील यांचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

परंतु त्याचवेळी अजित पवार यांनी केलेल्या ट्विटची आठवण होते. कोकाटे यांचा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यामुळे कदाचित उच्च न्यायालयाने कोकाटे यांना दिलासा दिल्यास व त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास अजित पवार व कोकाटे यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध पाहाता कोकाटे यांना पुन्हा मंत्री केलं जाऊ शकतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT