Rohit-Pawar-On-Manikrao-Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate: विधिमंडळात ऑनलाईन रमीचा डाव; अखेर मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवार यांना कोर्टात खेचलेच!

Manikrao Kokate playing Rummy, Rohit Pawar viral video, Kokate file court case: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे म्हणतात, "मी सभागृहात ऑनलाईन रमी खेळलोच नाही, व्हायरल व्हिडिओ मॉर्फ"

Sampat Devgire

Kokate Vs Rohit Pawar News: मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात ऑनलाईन रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून मंत्री माणिकराव कोकाटे आणि आमदार रोहित पवार यांच्यात जोरदार राजकीय वाद रंगला होता. आता या वादाने नवे वळण घेतले आहे.

तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधान परिषदेच्या सभागृहात ऑनलाईन रमी खेळत होते. असा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी एक्स वर पोस्ट केला होता. हा व्हिडिओ फेसबुक वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांमध्ये तो गाजला.

या व्हिडिओमुळे राज्यभरातील शेतकरी आणि नागरिकांनी कोकाटे यांना टीकेचे लक्ष्य केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील त्याचा वारंवार खुलासा करावा लागला होता. प्रकरणामुळे मुख्यमंत्र्यांनीही कोकाटे यांच्यावर प्रतिक्रिया दिली.

सभागृहात कामकाज सुरू असताना ऑनलाइन रमी खेळण्याचा आरोप कोकाटे यांना अडचणीचा ठरला. याबाबत मोठ्या प्रमाणावर टीका झाली. त्यामुळे कोकाटे यांचे कृषी हे खाते काढून घेण्यात आले होते.

स्वतः मंत्री कोकाटे यांनी आपण रमी खेळत नसल्याचे सांगितले. आपण मोबाईल स्क्रीनवर आलेले चित्र स्वाईप करत होतो, असा दावा त्यांनी केला होता. यासंदर्भात व्हायरल झालेला व्हिडिओ मॉर्फ केलेला होता.

या संदर्भात व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आमदार रोहित पवार यांना कोकाटे यांच्या वतीने नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीची आमदार पवार यांनी खिल्ली उडवत उत्तर देण्याचे टाळले. कोकाटे यांचीही नोटीस देखील बातमीचा विषय ठरली होती.

आता क्रीडा मंत्री कोकाटे यांनी नाशिकच्या न्यायालयात आमदार रोहित पवार यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. या दाव्याची तपासणी येत्या 24 सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर या खटल्याचे कामकाज केव्हा सुरू होते याची प्रतीक्षा होईल.

यानिमित्ताने पुन्हा एकदा आमदार कोकाटे सभागृहात ऑनलाईन रमी खेळत असल्याचा विषय चर्चेला आला आहे. मनोज पिंगळे यांनी कोकाटे यांच्या वतीने हा खटला जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती नरवाडिया यांच्याकडे सादर केला आहे. या दाव्यामुळे आमदार पवार यांना नाशिकच्या कोर्टात हजेरी लावावी लागेल हे मात्र नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT