Manikrao Kokate & Rohit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate Politics: क्रीडा खाते गमावलेल्या माणिकरावांच्या आमदारकीवर आज फैसला? विरोधकांनी वाढवला दबाव!

Manikrao Kokate sports department removal: माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकीपणाला लागली असतानाच त्यांच्या अटकेसाठी पोलिस यंत्रणा कार्यरत

Sampat Devgire

Manikrao Kokate News: माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. मंत्रीपद गेल्यानंतर आता त्यांची आमदारकी अडचणीत आली आहे. याबाबत न्यायालय काय निर्णय घेते याची उत्सुकता आहे.

आमदार माणिकराव कोकाटे यांनी शासकीय सदनिका घेतली होती. तीस वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात त्यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याने ते दोषी आढळले. याबाबत नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवल्याने त्यांचे राजकीय करिअर संकटात आले.

माजी मंत्री कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे खाते काढून घेतले होते. त्यामुळे माणिकराव कोकाटे अवघ्या एक वर्षात मंत्रीपदावरून पायउतार झाले.

आता लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. याबाबत माजी मंत्री कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात या प्रकरणी आज सुनावणी अपेक्षित आहे. आमदार रोहित पवार यांसह काँग्रेस नेत्यांनी दबाव वाढवला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात माजी मंत्री कोकाटे यांना दिलासा न मिळाल्यास त्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. नाशिकच्या पोलिसांनी त्यांच्या अटकेची तयारी केली आहे. मात्र उच्च न्यायालयातील सुनावणी कडे पोलिसांचेही लक्ष लागले आहे. त्यामुळे त्यांची अटक टळली होती.

या प्रकरणात माजी मंत्री कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे दोघांनाही शिक्षा झाली आहे. कोकाटे यांचे विरोधक माजी मंत्री (कै) तुकाराम दिघोळे यांनी याबाबत दावा दाखल केला होता. त्यांच्या कन्या अंजली दिघोळे यांनी त्याचा पाठपुरावा केला. तालुक्यातील अंतर्गत राजकारणाने तीस वर्षांनी श्री कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा बळी घेतला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात आज श्री कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळावी अशी अपेक्षा आहे. त्याची सुनावणी आज पुढे गेल्यास कोकाटे यांच्या अडचणी वाढणार आहेत. विरोधी पक्षांनी आता थेट लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार कोकाटे यांचे आमदार रद्द करावी यासाठी दबाव वाढवला आहे. त्यामुळे मंत्रीपद गमावलेल्या कोकाटे यांची आमदारकीही संकटात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT