Girish Mahajan Politics: गिरीश महाजनांची अचूक खेळी, गुलाबरावांना घेणार बरोबर; अजितदादांच्या राष्ट्रवादीला दाखवला ‘कात्रजचा घाट’!

Girish Mahajan BJP Shiv Sena will isolate NCP, Jalgaon BJP Shiv Sena alliance confirmed for corporation-जळगाव महापालिका निवडणुकीत गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील आले एकत्र, राष्ट्रवादीला पाडणार एकटे
Girish-Mahajan-Ajit-Pawar-Gulabrao-Patil
Girish-Mahajan-Ajit-Pawar-Gulabrao-PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News: अजित पवार यांच्या बालेकिल्ला असलेल्या पुण्यातच भाजपने त्यांची कोंडी करण्याची चाल खेळली. पिंपरी चिंचवड आणि पुणे पाठोपाठ जळगाव महापालिकेतही त्याची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मजबूत पकड आहे. बहुतांशी सत्तास्थाने भाजपच्या ताब्यात आहेत. त्या दृष्टीने आगामी निवडणुकांसाठी भाजपने पुन्हा कंबर कसली आहे.

जळगाव महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची युती ठरली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात त्यावर एकमत झाले. आता जागा वाटपाची चर्चा सुरू आहे.

Girish-Mahajan-Ajit-Pawar-Gulabrao-Patil
Girish Mahajan Politics: गिरीश महाजन '100+' वर ठाम, शिंदे शिवसेना पक्षाच्या अफाट अपेक्षा ठरताहेत महायुतीला अडसर?

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने तिरकी चाल खेळवी. शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजप यांची युती जवळपास निश्चित आहे. मात्र तिसरा भिडू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला त्यांनी बाजूला केले आहे.

Girish-Mahajan-Ajit-Pawar-Gulabrao-Patil
Manikrao Kokate politics: छगन भुजबळ यांना टार्गेट करता करता माणिकराव कोकाटे स्वतःच झाले हिट विकेट!

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती निश्चित झाली आहे. या महापालिकेत ७५ जागा आहेत. त्यात भाजप ६० आणि शिवसेना १५ असा फार्मूला ठरल्याचे बोलले जाते.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने गेल्या काही दिवसात आपली ताकद वाढवली होती. या पार्श्वभूमीवर भाजपने महापालिकेवरील सत्ता कायम ठेवण्यासाठी जास्तीत जास्त जागा आपल्याकडे ठेवण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बरोबर घेणे भाजपला अडचणीचे होते.

भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी महापालिका निवडणुकांमध्ये महायुती करावी असा संदेश दिला आहे. यापार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर महाराष्ट्रातील नगर वगळता चार जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये जळगाव ही महत्त्वाची महापालिका आहे.

महायुतीच्या घटक पक्षांत जागा वाटपाचा प्रश्न गंभीर आहे. या पार्श्वभूमीवरच प्रत्येक महापालिकेत वेगळा फार्मूला पुढे आला आहे. त्यात जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनवेळी एकटे पाडले.

महायुती महापालिका निवडणुकीची तयारी करीत आहे. महाविकास आघाडी मात्र विस्कळीत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला आता महाविकास आघाडीशी सख्य करता येत नाही. महायुती जवळ करीत नाही. या कोंडीमुळे वेगळा विचार करावा लागणार आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com