Rajabhau Vaje & Manikrao Kokate
Rajabhau Vaje & Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sinnar APMC election News : माणिकराव कोकाटे विरूद्ध राजाभाऊ वाजे लढत!

Sampat Devgire

Straight fight in sinnar APMC election : सिन्नर बाजार समितीच्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात निवडणुकीला अतिशय गंभीर वळण मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांनी पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे यांची साथ सोडली. आता आमदार कोकाटे विरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यात सरळ लढत आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. (A tough fight in Kokate & Vaje group in Sinnar)

सिन्नर बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC election) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना आज धक्का बसला. शिवसेना ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Vaje) यांच्या नेतृत्वाखाली विविध नेते एकत्र आले. त्यामुळे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) घटक पक्ष परस्परांविरोधात लढणार आहेत.

आमदार कोकाटे यांच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार असे, सोसायटी गट : शशिकांत गणपत गाडे, भाऊसाहेब रामराव खाडे, अनिल दशरथ शेळके, रविंद्र सुर्यभान शिंदे, विनायक हौशिराम घुमरे, आबासाहेब विठ्ठल जाधव, ज्ञानेश्वर विठ्ठल हारळे, सिंधुबाई केशव कोकाटे, सुरेखा ज्ञानेश्वर पांगारकर, संजय वामन खैरनार, रामदास मारूती जायभावे. ग्रामपंचायत गट : पंढरीनाथ धर्माजी ढोकणे, भाऊसाहेब नाना नरोडे, जगदीश देवराम कुर्हे, दिपक तुकाराम जगताप, व्यापारी गट : जगन्नाथ गंगाधर खैरनार, विजय रामनाथ तेलंग आणि हमाल-मापारी गट : नवनाथ शिवाजी नेहे.

शिवसेना नेते माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या जनसेवा परिवर्तन पॅनेलचे उमेदवार असे, सोसायटी गट : शरदराव ज्ञानदेव थोरात, सोमनाथ गंगाधर जाधव, शरद उमाजी गिते, जालिंदर जगन्नाथ थोरात, योगेश रंगनाथ माळी, शिवनाथ कचरू दराडे, सुनिता छबू कदम, ताराबाई बहिरू कोकाटे, शिवाजी विठोबा खैरनार, नवनाथ प्रकाश घुगे. ग्रामपंचायत गट : रवींद्र रामनाथ पवार, श्रीकृष्ण मारूती घुमरे, गणेश भिमा घोलप, प्रकाश पोपट तुपे, व्यापारी गट : सुनिल बाळकृष्ण चकोर, रवींद्र विनायक शेळके, हमाल व तोलारी गट : किरण सुभाष गोसावी.

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पॅनेलकडे बाजार समितीची सत्ता होती. ती हस्तगत करण्यासाठी विरोधकांनी नियोजनबद्ध पावले टाकत आघाडी घेतली आहेत. आता कोकाटे यांच्या विरोधात माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली उदय सांगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख बाळासाहेब वाघ, ठाणगावचे नामदेव शिंदे, कोकाटे यांचे बंधू भरत कोकाटे असे विविध नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार हे नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT