Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate News: कृषिमंत्रीपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'I AM Very Happy...'

Manikrao Kokate Politics : महायुती सरकारकडून गुरुवारी (ता.31) माणिकराव कोकाटे यांना कृषिमंत्रिपदावरुन हटवण्यात आलं.यानंतर त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार सोपवण्यात आला आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आले असतानाच त्यांचे सभागृहातच रमी खेळतानाचे व्हिडिओ बाहेर आल्यानं एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी हाच मुद्दा उचलून धरत सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली. यानंतर अखेर कोकाटेंची कृषिमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. आता कोकाटेंची कृषिखातं गेल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

महायुती सरकारकडून गुरुवारी (ता.31) माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना कृषिमंत्रिपदावरुन हटवण्यात आलं.यानंतर त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार सोपवण्यात आला आहे. यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, यावेळी जो निर्णय घेतला आहे, तो मला मान्य आहे. दत्तात्रय भरणेंना काही मदत लागली, तर मी नक्की करेन आणि त्यांची मला मदत लागल्यास मी घेईन, असंही मंत्री कोकाटेंनी म्हटलं आहे. याचवेळी त्यांना नवीन खातं आवडलं का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी I AM VERY HAPPY, असं बोलकं उत्तर दिलं.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना कृषी खात्याची जबाबदारी स्विकारण्याची ऑफर दिली होती. हे खातं चांगलं आहे, मोठं आहे आणि तुम्ही ते घ्या, असा आग्रह आपल्याला अजित पवारांनी केला होता, असंही भुजबळ यांनी म्हटलं.

भुजबळ म्हणाले, ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये आलो. तेव्हा अजित पवार यांनी त्यांच्याकडे अर्थखाते घेतले होते. त्यानंतर उरलेल्या खात्यांची यादी अजित पवारांनी माझ्यासमोर ठेवली. त्यातून हवे ते खाते तुम्हाला घ्या म्हणून सांगितले. त्यावेळी आम्ही चर्चा करत असताना कृषी खातं तुम्ही घ्या म्हणून अजित पवारांनी मला खूप आग्रह केला असा खुलासा भुजबळांनी केला आहे.

'तीनवेळा माझी भेट...'

माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे माणिकराव कोकाटे यांचा खातेबदल सुरू असताना हे अजित पवार यांना भेटले. फडणवीस यांनाही भेटले. यावर मुख्यमंत्री म्हणाले, तुमची माहिती अर्धवट आहे. त्यांनी माझी दोनवेळा नाही, तर तीनवेळा माझी भेट घेतली. ती वेगवेगळ्या कारणाने भेट घेतली आहे. कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडे यांच्या पातळीवर होत नाही. ती मी, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर होते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT