Girish Mahajan : गिरीश महाजनांची थेट जिल्हाधिकाऱ्यांना भाजपत येण्याची ऑफर ; म्हणाले, "अशा माणसांची आम्हाला.."

Jalgaon Collector Ayush Prasad : जळगावात महसूल दिन सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ही ऑफर दिली. त्यानंतर जळगावच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे.
Girish Mahajan, Jalgaon Collector Ayush Prasad
Girish Mahajan,Jalgaon Collector Ayush PrasadSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : जळगावात महसूल दिन सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधत तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना भाजपत येण्याची ऑफर दिली.

गिरीश महाजन म्हणाले, प्रशासकीय सेवेत चांगले काम करणारे लोक आठवणीत राहतात आणि शेवटपर्यंत त्यांचे नाव घेतलं जातं. त्यामध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचेही काम तसेच आहे. सांगितलेलं काम ते पूर्णच करतात. काम तर ते चांगल करतातच त्याशिवाय सगळ्यांना सांभाळून घेतात. सर्वांना सांभाळण्यात त्यांचा हातखंडा आहे. मला वाटतं ते माझे आहे, तुम्हाला वाटतं ते तुमचे आहेत, सावकारेंना वाटतं ते त्यांचे आहे आणि तिकडे पूर्वीकडे पण वाटतं ते माझेच आहेत असं गिरीश महाजन म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. आमदार सुरेश भोळे तुम्ही मामा आहात पण ते सर्वांना मामा बनवतात. अस महाजन म्हणाले.

गिरीश महाजन पुढे म्हणाले, पुढे मागे फार दिवस मी नोकरीत राहणार नाही, मला राजकारणात यायचं आहे असं जिल्हाधिकारी एकदा म्हला म्हणाले होते. तसेही अशा माणसांची आम्हाला गरज आहेच. केंद्रात देखील किती अधिकाऱ्यांना आम्ही मंत्री केले आहे ते तुम्ही बघितले आहे. त्यामुळे मागे पुढे त्यांचाही विचार नक्कीच होईल. असे सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना भाजपत येण्याची ऑफरच दिली. अर्थात ते मिश्कीलपणे हे सर्व बोलले असले तरी जळगावच्या राजकीय वर्तुळात त्यावर खमंग चर्चा रंगली आहे.

Girish Mahajan, Jalgaon Collector Ayush Prasad
Chhagan Bhujbal : कृषी खातं तुम्ही घ्या, अजित पवारांचा मला खूप आग्रह होता..इतकं सगळं घडल्यानंतर भुजबळांचा गौप्यस्फोट

दरम्यान याच कार्यक्रमात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाजन यांचे नाव घेत चांगलीच फटकेबाजी केली. पाटील म्हणाले, गिरीश महाजन हेच आजच्या पिक्चरमधले हिरो आहेत. दिसायला देखील ते हिरो आहेत. आमच्यासारखे काळे बेंद्रे नाहीत. सध्या तुमचंच दुकान चाललंय, आम्ही ते लांबूनच बघतो. जे चाललंय ते बरं चाललंय अशी टोलेबाजी त्यांनी केली.

Girish Mahajan, Jalgaon Collector Ayush Prasad
BJP Politics : 'संपूर्ण महाराष्ट्र भोंगे मुक्त करायचा', भाजप नेत्याने कंबर कसली

गुलाबराव पाटील पुढे मिश्किलपणे म्हणाले, आम्ही सत्तर टक्के आयुष्य हे विरोधात घातले. मोर्चे काढणे, गाड्या अडवणे, गाड्या फोडणे यातच आयुष्य गेलं. हा आमचा धंदा होता. पण जेव्हापासून यांच्या पार्टनरशिपमध्ये सत्तेत आलो तेव्हापासून हे कधी गुवाहटीला तर कधी कुठेच घेऊन जातात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com