Manisha Khatri and Dashrath Patil clash News : गेल्या आठवड्यात झालेली कुंभमेळा ध्वजारोहण तयारी बैठक आरोप प्रत्यारोपांनी गाजली होती. विशेष म्हणजे या बैठकीत थेट आयुक्तांनी माजी महापौरांवर आरोप केली होता. त्यामुळे हे प्रकरण आता पुन्हा तापले आहे.
कुंभमेळा तयारीबाबत महापालिका उदासीन आहे. महापालिकेला कुंभमेळा समजत नाही. नागरिकांच्या आणि विशेषता शहरातील हिंदुत्ववादी भावनांची अवहेलना महापालिका आयुक्त करत आहेत, असा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला होता.
या आरोपाला आयुक्त मनीषा खत्री यांनीही तात्काळ बैठकीतच उत्तर दिले होते. माजी महापौर यांनी आपल्याला नागरिकांच्या आणि हिंदुत्ववाद्यांच्या भावना काय आहेत हे सांगू नये. माजी महापौरांनी मंदिरे काढण्यासाठी पत्र दिले होते, असा प्रत्यारोप आयुक्तांनी केला.
आयुक्तांच्या या आरोपाला आता माजी महापौर पाटील यांनी उत्तर दिले आहे. आयुक्तांना त्यांनी थेट आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. 'आयुक्त खोटे बोलत असून त्यांनी राजकारणाचा भाग होऊ नये' असं ते म्हणाले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कामकाज करण्याचे काही संकेत असतात. हे संकेत आयुक्त खत्री यांनी मोडले आहेत. आपण कोणतेही मंदिर पाडण्याचे पत्र दिले नव्हते. सार्वजनिक सुविधांच्या आरक्षण बदलाला विरोध करणारे पत्र दिले होते.
माजी महापौरांच्या या दाव्याने आयुक्त आणि दशरथ पाटील यांच्यात नवा वाद उभा राहिला आहे. या आरोप प्रत्यारोपात वड्याचे तेल वांग्यावर असे तर होत नाही ना? अशी चर्चाही सुरू झाली आहे.
पंचवटी भागातील सर्वे क्रमांक 294 आणि 295 ही जागा सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित आहे. या आरक्षित जागेचा निवासी जागेत बदल करण्याचे प्रयत्न महापालिका करीत आहे. त्याला आपला विरोध आहे. या आरक्षण बदलाचा शहराच्या नागरी सुविधांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
शहर आणि नागरिकांच्या हिताचा आपला हेतू आहे. महापालिका आयुक्त मात्र त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहे. आयुक्तांनी याबाबत तातडीने खुलासा करून स्पष्टीकरण द्यावे. आठ दिवसात स्पष्टीकरण न दिल्यास आपण आयुक्तांच्या बदलीची मागणी करू असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.