Gulabrao Patil On Manoj Jarange Audio Clip : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिपचा बॉम्ब फोडून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावावर भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. त्यानंतर पत्रकारपरिषदेत पुरावा म्हणून त्यांनी एक कथित ऑडिओ क्लीक ऐकवली.
जरांगे यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत ५०० कोटी रुपये पोहचल्याचे एका महिलेने म्हटल्याचा दावा या क्लिपमध्ये असून, सरकारने याची चौकशी करावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. या प्रकरणावर शिंदे सेनेच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात असून आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील माध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं आहे.
याप्रकरणात श्रीकांत शिंदे यांचे नाव घेऊन एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला गोत्यात आणण्याचा तसेच बदनाम करण्याचा डाव असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. जरांगे पाटील यांनी सादर केलेल्या क्लिपची फॉरेन्सिक लॅबमार्फत आणि एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या, असेही पाटील म्हणाले.
यामागे शिवसेना आणि भाजपामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न आहे का, याचीही चौकशी व्हायला हवी, एसआयटी स्थापन करून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जावं, कारण आता हे स्पष्ट झाले आहे की, 500 कोटी शिंदेंनी दिले नाहीत आणि 500 कोटी जरांगेंनी घेतले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होऊ द्या. या प्रकरणात जे समोर यायचे ते येईल. पण आमच्या नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी याची सखोल चौकशी करावी अशी मागणी गुलाबराव पाटलांनी केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आणि कोर्टात टिकत नसलेले आरक्षण चांगले वकील देऊन टिकवले, मात्र, आज त्यांच्यावर व त्यांच्या मुलावरच असे बोलले जात आहे हे दुर्दैवी असल्याचे पाटील म्हणाले. कोणी कोणावरही काहीही आरोप करेल हे चालणार नाही. आम्हीही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला.
ऑडिओ क्लिप मध्ये कुणाचा आवाज आहे त्याची तपासणी करावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणार आहोत असे पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.