Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhangar Reservation : ''...तर धनगर समाजाला काय फक्त सभांसाठीच बोलवता का?'' जरांगेंचा भुजबळांना सवाल!

Jarange Vs Bhujbal : ''ओबीसी समाजाचा एवढा कळवळा आहे, तर मग...'' असा सवालही केला आहे.

Mayur Ratnaparkhe

किरण कवडे-

Nashik News : मराठा आरक्षणाला विरोध करणारे मंत्री छगन भुजबळ यांनी धनगर आरक्षणाविषयी आपली भूमिका जाहीर करावी. आरक्षणाला पाठिंबा आहे की नाही, हे धनगर समाजाला स्पष्टपणे सांगा, असे आव्हान देत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर निशाणा साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील व मंत्री छगन भुजबळ हे एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. भुजबळांनी बीडमध्ये ओबीसींचा मेळावा घेत जरांगेवर थेट हल्लाबोल केल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. अशा परिस्थितीत मनोज जरांगे पाटील नाशिकच्या सभेत काय बोलणार याविषयी राज्यातील जनतेला उत्सुकता लागून होती.

अपेक्षेप्रमाणे त्यांनी आपल्या भाषणात भुजबळांचा समाचार घेतला. 'भुजबळांचे आता वय झाले आहे. त्यांनी सांभाळून बोलले पाहिजे. त्यांना ओबीसी समाजाचा एवढा कळवळा आहे तर मग स्वत:च्या शिक्षण संस्थांना महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे नाव का दिले नाही?, असा प्रश्न उपस्थित केला.

तसेच, जरांगे पाटील यांचे भाषण सुरू असतानाच उपस्थित समाजबांधवांनी भुजबळांविरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. यावरून त्याचा रोष दिसून आला.

मराठा समाजापाठोपाठ धनगर आरक्षणाचाही मुद्दा उपस्थित होत आहे. याविषयी भुजबळांनी आपली भूमिका जाहीर करावी. पाठिंबा असेल तर तसे सांगावे, नसेल तर धनगर समाजाला फक्त सभांसाठीच बोलवता का, असा प्रश्नही जरांगे यांनी उपस्थित केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT