Maratha Reservation News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. या अटीवरच जरांगे पाटलांनी आपले उपोषण काही दिवसांसाठी स्थगित केले. यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू करत ठिकठिकाणी मोठमोठ्या सभा ते घेत आहेत. या सभेच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी ते रान उठवत आहेत.
मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ या मागणीला विरोध करत आहेत. त्यामुळे जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामध्ये जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, आता जरांगे पाटलांनी संतप्त होत "अजितदादा त्यांना (भुजबळांना) समज द्या, अन्यथा आम्हाला शांतीचा मार्ग सोडावा लागेल,"असा थेट इशारा दिला आहे. ते आज नेवाशात बोलत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"मराठा समाजाच्या लाटेत कुणालाच काही सुचेना. आरक्षण असलेले आणि नसलेले सगळे मराठे एकत्र झाले आहेत. चारही बाजूंनी मराठ्यांनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. आपण कुणाचे नाव घेत नाही. ज्यांची लायकी नाही, त्यांचे नाव कशाला घ्यायचे ? सरकारने मराठ्यांना गांभीर्याने घ्यावे, आमचे बोर्ड फाडले, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बोर्ड फाडले तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल," असेही जरांगे पाटील म्हणाले.
"चिल्लर चाळे थांबवले नाही तर सरकारला जड जाईल. हे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची वाट लावतात. सरकारने शांत केले नाही तर सरकार डॅमेज होईल. फडणवीस यांनी त्यांना समज द्यावी, अन्यथा मराठे तुमच्यादेखील चाव्या काढून घेतील. एकदा पदरात आरक्षण मिळू द्या, मग यांच्याकडे बघू. ते अंबडमध्ये येऊन खूप काही बोलून गेले, पण आरक्षण जवळ आलंय म्हणून संयम धरला, अन्यथा टप्प्यात कार्यक्रम केला असता. त्यांच्यात किती खुमखुमी आहे बघूया", अशा कडक शब्दांत जरांगे पाटलांनी नाव न घेता भुजबळांना सुनावलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.